ड्राय- डे- च्या दिवशी हॉटेलवर छापा हॉटेल चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

 ड्राय- डे- च्या दिवशी हॉटेलवर छापा 
हॉटेल चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल



-------------

 कडा/ वार्ताहर 

----------------

तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील 'हॉटेलवर ड्राय- डे- च्या दिवशी छापा मारून पोलिसांनी एक हजार आठशे रुपयाची देशी दारू जप्त करून हॉटेल चालकाविरुद्ध मुंबई दारूबंदी अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.



आष्टी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की  तालुक्यातील नगर -बीड रोडलगत असलेल्या शेरी बुद्रुक येथील हॉटेल देवयानी या ठिकाणी शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ड्राय-डे असतानाही या हॉटेलवर बेकायदेशीररित्या देशी दारूची विक्री होत असल्याची खबर आष्टी पोलिसांना मिळाली होती. त्या माहिती आधारे कडा पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार  तेथे छापा मारून एक हजार आठशे रुपये किमतीची देशी दारू जप्त करून संबंधित हॉटेलचालक शहादेव महाडिक यांच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोह सव्वाशे, पोह नवले, पोना आहेर, पोशी खोले आदि पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई केलीआहे.

-------%----



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.