येथे लघवी करू नका महिला आहेत असे म्हणाल्याचा राग आल्याने तीन अज्ञाताकडून दोन जणांवर गोळीबार आरोपीच्या शोधार्थ तीन पथके रवाना
------------------------------------------------------
*जामखेड (प्रतिनिधी - नासीर पठाण )*
जामखेड - जामखेड येथील विंचरणा नदीच्या नवीन पुलावर रविवारी रात्री दहाच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्ती लघुशंका करत असताना फिर्यादीने येथे लघवी करू नका महीला आहेत असे म्हणाल्याचा राग आल्याने फिर्यादीस शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण करून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये साक्षीदाराच्या पायाला गोळी लागली असून त्यास अहिल्यानगर येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. घटना घडताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ प्रशांत खैरे, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन तीन पथके आरोपीच्या शोधार्थ पाठवले आहे.
याबाबत जामखेड पोलीसात अदित्य बबन पोकळे (वय 20 वर्षे धंदा वॉशिंग सेंटर रा पोकळेवस्ती, जामखेड) याने फिर्याद दिली की, रवीवार दि. १ रोजी रात्री दहा वाजता विंचरणा नदीजवळ घर आहे तेथे पोकळे वस्तीवरील नागरीक व महीला होत्या. यावेळी एका चारचाकी वाहनातून तीन अज्ञात इसम उतरले व ते तेथे लघवी करू लागले त्यांना येथे लघवी करू नका महीला बसल्या आहेत. असे म्हणल्याचा राग आल्याने त्यांनी फिर्यादी आदीत्य पोकळे यास शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी तेथे कुणाल बंडु पवार (वय २० रा. जामखेड) आला तीन अज्ञातांनी त्यांच्याजवळील पिस्टलने या दोघांवर गोळीबार केला.
कुणाल पवार याच्या पिंढरीतून गोळी आरपार गेली. त्यामुळे त्याला जामखेड येथील खाजगी दवाखान्यात उपचार करून अहील्यानगर येथील दवाखान्यात पुढील उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
गोळीबार झाल्याची घटना पोलीस तात्काळ घटनास्थळी गेले परंतु तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक उगले व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली. सदर गुन्ह्य़ात वापरलेली कारच्या नंबरवरून पोलीसांनी शोध घेतला असून आरोपीच्या शोधार्थ तीन पथके रवाना केली आहे.
पोलीस निरीक्षक महेश पाटील हे घटनेचा तपास करत असून लवकरच आरोपीस अटक करण्यात येईल असे सांगितले.
stay connected