मेडिकल व्यवसाय करताना कायद्याच्या चौकटीत राहून व्यवसाय करावा. - अरूण गोडसे

 मेडिकल व्यवसाय करताना कायद्याच्या चौकटीत राहून व्यवसाय करावा. - अरूण गोडसे.

   




     केमिस्ट हृदयसम्राट मा. श्री जगन्नाथ( आप्पा) शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आयोजित मार्गदर्शन शिबिरामध्ये   श्री अरुणजी गोडसे (सहाय्यक आयुक्त,अन्न व औषध प्रशासन सोलापूर,) यांनी मेडिकल व्यवसाय करताना कायद्याच्या चौकटीत राहून करावा असे आवाहन केले.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत  माळशिरस तालूका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड यांनी केले.

     यावेळी बोलताना अरुण गोडसे म्हणाले की,  संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा माळशिरस तालूक्यातून जात असून वारकरी भाविकांना लागणारे औषधांची गैरसोय होऊ नये व आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यक असणारा सर्व औषध साठा आपल्या मेडिकल मध्ये उपलब्ध ठेवावा,याची काळजी केमिस्ट बांधवांनी घ्यावी व वारकरी भाविकांची सेवा करावी.

  यावेळी बसवराज मणुरे(Director AIOCD Ltd , निमंत्रित सदस्य MSCDA),सचिन बुगड (अन्न व औषध प्रशासन अधिकारी सोलापूर), व्यंकटेश पुजारी( जिल्हाध्यक्ष SDCDA,) राजेश विरपे (सचिव SDCDA,) प्रशांत खलिपे खजिनदार (SDCDA).प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

   यावेळी संदिप पारेख यांनी Wellmend (Generic Division) AIOCD Pharma limited वितरण प्रणालीची माहिती व विक्रांत माने देशमुख यांनी मेडिकल व्यवसायासाठी GST, मुलभूत समज आणि अंमलबजावणी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जगताप यांनी केले तर आभारप्रदर्शन आप्पासाहेब शेंडगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री तुषार बेंद्रे, श्री अतुल आर्वे, श्री किशोर काळे पाटील, श्री आनंद चव्हाण, श्री शेखर गाडेकर, श्री गिरीश एकतपुरे, श्री शंकर पवार, श्री प्रदीप भोरे, श्री रवी जगताप, श्री नितीन जोशी आदींनी परिश्रम घेतले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.