आ.सुरेश धस यांच्या पाठपुराव्याने मुर्शदपुर ग्रामपंचायतला सर्वाधिक घरकुले मंजूर--सरपंच अशोक मुळे
*****************************
आ.धस यांचे मानले आभार
******************************
****************************
आष्टी (प्रतिनिधी)
पंतप्रधान घरकुल आवास योजना-ग्रामीण अंतर्गत २०२५-२६ करिता
मुर्शदपुर कासारी शिदेवाडी ग्रुप ग्रामपंचायत साठी ४४० घरकुले आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वेळोवेळी पाठपुराव्याने मंजूर केले. असून केंद्र सरकार,राज्य सरकार व लोकाभिमुख नेतृत्व आमदार सुरेश धस यांचे आभार मुर्शदपुर,कासारी,शिदेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच अशोक मुळे यांनी मानले आहेत.
आष्टी,पाटोदा,शिरूर मतदार संघाचे भाग्यविधाते व सर्व अठरापगड जातीला सोबत घेऊन विकासगंगा मतदारसंघात आमदार सुरेश धस यांच्या रूपाने येणार असून पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत आष्टी मतदार संघाला
१८ हजार ७ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाले आहेत. यामध्ये कासारी मुर्शदपुर शिदेवाडी ग्रामपंचायत साठी ४४० घरकुले आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नाने मंजूर झाले असून यासाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.यामध्ये सर्व जाती धर्मातील लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार असून या लाभार्थ्यांनी आमदार सुरेश धस यांचे जाहीर आभार मानले आहेत.
यासाठी ग्रामपंचायतचा जागा उपलब्धेप्रमाणे पीटीआर किंवा सातबारा,आधार बँक पासबुक या आवश्यक कागदपत्राची पूर्तता संबंधित गावातील ग्रामसेवक किंवा ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांच्याकडे करावेत.घरकुल यादीत दिलेल्या लाभार्थ्यांनी नियमाप्रमाणे कागदपत्रे ऑनलाइन प्रणाली मार्फत करून घ्यावेत म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुलाचा हप्ता वितरण जमा होण्यास सुलभ जाईल.
माझ्या ग्रामपंचायतला आमदार सुरेश धस यांनी सर्वाधिक घरकुले मंजूर करून दिल्याबद्दल केंद्र सरकार, राज्य सरकार व सदैव जनसेवेत असलेले नेतृत्व आमदार सुरेश धस यांचे जाहीर आभार कासारी,मुर्शदपूर,शिदेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच अशोक मुळे यांनी मानले आहेत.
stay connected