Punjab Dhakh शेतकऱ्यांना पंजाब डख यांनी दिला इशारा

 Punjab Dhakh शेतकऱ्यांना पंजाब डख यांनी दिला इशारा



Punjab Dhakh प्रसिद्ध हवामान अभ्यासाक पंजाबराव डख यांनी आज 22 मे 2025 वार गुरुवार रोजी हवामान अंदाज वर्तवताना म्हटले की, 22 मे म्हणजेच आजपासून ते 30 मे पर्यंत संपूर्ण राज्यात ओढे-नाले, नद्या भरून वाहतील इतका मोठा प्रमाणात पाऊस पडणार आहे. तसेच बोलताना त्यांनी पुढे म्हटले की, मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडणार असून मुंबईकरांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. तसेच राज्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण आणि उत्तर महाराष्ट्र तसेच कोकण, खानदेश, मराठवाडा इत्यादी भागांमध्ये 22 ते 30 मे या कालावधीत नदीनाले भरून वाहतील अशा स्वरूपाचा अतिमुसळधार पाऊस पडणार आहे.



आज पासून ते 30 मे पर्यंत हा पाऊस दोन-दोन दिवस असा भाग बदलत पडणार असून या पावसामुळे जमिनीमध्ये चक्क एक फुट ओल जाऊ शकते अशा प्रकारे पावसाचे स्वरूप असणार असे त्यांनी म्हटले. तसेच जर आपण जिल्हानिहाय पावसाचा अंदाज बघितला तर त्यांनी म्हटले की हा पाऊस मुंबईला सर्वाधिक पडणारा असून त्यासोबतच नाशिक तसेच कोकण, कोल्हापूर, सातारा आणि पुणे इत्यादी ठिकाणी जास्त प्रमाणात पडणार आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्याला देखील या पावसाचा जोरदार तडाखा बसणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र मुंबईच्या बाबतीत त्यांनी म्हटले की, अक्षरशः जनजीवन विस्कळीत होईल इतका पाऊस पडेल. तसेच ज्या परिसरामध्ये 15 ते 30 मे दरम्यान पाऊस पडेल त्या ठिकाणी पावसाळ्यात चांगला पाऊस पडेल असे देखील त्यांनी त्यांचा अंदाज वर्तवताना म्हटले आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.