फार्मसी क्षेत्रातील अमर्याद संधी
मानवी जीवन आरोग्य औषधे या साखळीचे आणि औषध संशोधनाचे महत्त्व कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण जगाला समजले आहे. त्या दृष्टीने औषधे तसेच उपचार पद्धतीचा ही विचार केला जात आहे याच सोबत फार्मसी क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे माहिती तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे फार्मसी क्षेत्रात सुद्धा विकासाच्या आणि नवनवीन आव्हानात्मक संशोधन सेवा रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.
औषधांच्या जागतिक बाजारपेठेचे मूल्य व 1.2 ट्रिलियन डॉलर पेक्षा जास्त आहे.
भारतीय बाजारपेठ तीन हजार ८४६ अब्ज रुपयांचे आहे. सन 2025 पर्यंत ही बाजारपेठ 7000 अब्ज रुपयांची होईल असे विविध संशोधकांचे मत आहे. भारत जागतिक पातळीवर औषध निर्माण क्षेत्रातील व बायोटेक क्षेत्रातील तज्ञ मनुष्यबळ पुरवण्यासाठी जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे योगदान देतो.
*फार्मासिस्ट काय काम करतो?*
औषध उत्पादन करणे नवनवीन औषधे शोधणे जी औषधे उपलब्ध आहेत त्यात काळानुसार बदल करणे औषधांची गुणवत्ता तपासणी व व्यवस्थित संभाळण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करणे औषधे बाजारात आणण्यापूर्वी त्यांच्या चाचण्या करणे या औषधांचा मानवी शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांचा अभ्यास करून ते होऊ नये म्हणून उपाय सुचवणे.
*विविध संधी*
डी फार्मसी, बी फार्मसी व एम फार्मसी केलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी क्षेत्रात केमिकल इंडस्ट्रीज अन्न आणि औषध उत्पादन क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळतात. औषध निर्माते कंपनीमध्ये टॅबलेट, कॅप्सूल ,क्रीम्स ,ऑइंटमेंट्स इंजेक्टेबल्स अशा विविध डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची संधी. इंटरमिजिएट्स किंवा फॉर्मुलेशन आणि डोसेस फॉर्म, रक्त आणि प्लाझ्मा उत्पादने ,जैविक आणि जैवतंत्रज्ञान उत्पादने ,पशुवैद्यकीय औषधे, सौंदर्यप्रसाधने वैद्यकीय उपकरणे दंत उत्पादने साबण परफ्यूमरी, न्यूट्रासिटिकल क्षेत्रात स्वतःचा उत्पादन किंवा विक्री व्यवसाय सुरू करता येतो. औषधासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे व निर्मित केलेल्या औषधाचे पृथक्करण करणे. औषध विक्री होलसेल व रिटेल विक्रेता औषध निर्माती व विक्रीशी निगडित कायद्याचा अभ्यास (रेगुलेटरी येफेअर), औषधे बाजारात आणण्यापूर्वी त्याचे प्राण्यांवर तसेच हॉस्पिटलमध्ये मानव क्लिनिकल स्वयंसेवकांवर चाचण्या करणे ,औषध पॅकिंग डिपार्टमेंट ,रिसर्च अँड डेव्हलपमेंट ,सरकारी नोकरी संधी, ड्रग इन्स्पेक्टर ,हॉस्पिटल फार्मासिस्ट, कम्युनिटी फार्मासिस्ट, क्लीनिकल फार्मासिस्ट.
*आयटी क्षेत्रातील संधी*
वर्क फ्रॉम होम ,मेडिकल ट्रान्सक्रीप्शन मेडिकल कोडिंग, औषध माहिती केंद्रासाठी माहिती गोळा करणे.
*शिक्षण क्षेत्रातील संधी*
बी फार्मसी नंतर डी फार्मसी अभ्यासक्रमासाठी शिक्षक म्हणून ,एम फार्मसी नंतर बी फार्मसी अभ्यासक्रमासाठी शिक्षक म्हणून.
*डी फार्मसी म्हणजे काय*
औषध निर्माण शास्त्र पदविका म्हणजेच डिप्लोमा इन फार्मसी दोन वर्षांचा कालावधीसाठी कोर्स .
*पात्रता*
बारावी सायन्स पास (फिजिक्स केमिस्ट्री व बायलॉजी/फिजिक्स केमिस्ट्री व मॅथ्स एकत्र घेऊन)
*कागदपत्रे*
खुला गट - एसएससी मार्कशीट, एच एस सी मार्कशीट ,लिविंग सर्टिफिकेट आधार कार्ड झेरॉक्स (विद्यार्थ्यांचे) वोटर कार्ड, नॅशनलाईज बँक खाते, ई-मेल आयडी ,कॅटेगिरी साठी वरील सर्व कागदपत्रे व कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलेडीटी, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट.
*बी फार्मसी म्हणजे काय*
बॅचलर ऑफ फार्मसी (बी फार्म) हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे जो बारावी सायन्स नंतर करता येतो.
*प्रवेशासाठी पात्रता*
बारावी पास बारावी सायन्स पास (फिजिक्स केमिस्ट्री व बायोलॉजी/फिजिक्स केमिस्ट्री व मॅच एकत्र घेऊन) फिजिक्स केमिस्ट्री व बायोलॉजी/फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स ग्रुप मध्ये ओपन साठी 45 % पैकी व कास्ट साठी 40% पैकी बी फार्मसी डिग्री कोर्स साठी MHT-CET/NEET दिलेली असणे आवश्यक. इतर सर्व कागदपत्रे वरील प्रमाणेच डी. फार्मसी बी .फार्मसी व एम. फार्मसी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय भूत तत्वावर CENTRALIZED -ADMISSION PROCESS (CAP) महाराष्ट्र सरकारच्या वतीने राबवली जाते .बी फार्मसी डिग्री कोर्स झाल्यानंतर एम फार्मसी साठी प्रवेश घेता येतो.
प्रा. वर्षाराणी आव्हाड.(अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी अहिल्यानगर.)
stay connected