ग्रामपंचायतच्या गाळ्यात होत असलेला अवैध पणे दारु विक्रीचा व्यवसाय बंद करा अन्यथा उपोषणाचा इशारा

  ग्रामपंचायतच्या गाळ्यात होत असलेला अवैध पणे दारु विक्रीचा व्यवसाय बंद करा अन्यथा उपोषणाचा इशारा




 शिरूर : ग्रामपंचायतच्या गाळ्यात होत असलेला अवैध पणे दारु विक्रीचा व्यवसाय तात्काळ  बंद करा अन्यथा उपोषण करणार असल्याचा इशारा नामदेव दगडू लोंढे यांनी शिरूर तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे . त्यांनी निवेदनात म्हटले आहे की मौजे खालापुरी ता. शिरूर येथील आठवडी बाजार परिसरात तलाठी कार्यालय, खालापुरी शेजारी ग्रामपंचायत कार्यालयाच्या मालकीचे वाणिज्य विषयक काही गाळे आहेत. खरे तर ते जे गाळे ग्रामपंचायत कार्यालयाने बांधलेले आहेत. तेच मुळात ईनामी जमिनी मध्ये अवैध कब्जा, अतिक्रमण करुन बांधलेले आहेत. व. ते गाळे काही व्यवसायिक लोकांना भाडे तत्वावर उ‌द्योग, व्यवसाय करण्यासाठी व वापरण्या साठी दिलेले आहेत. त्या गाळ्यां शेजारी तलाठी सज्या खालापुरी हे कार्यालय आहे. व तलाठी सज्या खालापुरी कार्यालया शेजारील जो गाळा आहे. त्या गाळ्यात मागील एक वर्षापूर्वी पर्यंत भारतीय डाक घर शाखा, खालापुरी हे कार्यालय होते. परंतू भारतीय डाक घर आता इतरत्र' हालविण्यात आल्याने तो गाळा रिकामा होता व आता सरपंच/ग्रामविकास अधिकारी, खालापुरी यांच्या सहाय्याने तो गाळा कोणा तरी व्यक्तीला दिला आहे. व ज्या कोणा व्यक्तीस तो गाळा दिला आहे ती व्यक्ती सरपंच / ग्रामविकास अधिकारी यांच्या सहकार्याने दिवसरात्र राजरोसपणे त्या गाळ्यातून अवैध मार्गाचा अवलंब करून देशी व गावठी दारू विक्रीचा व्यवसाय करीत आहे. असा आरोप नामदेव लोंढे यांनी केला आहे . निवेदनात पुढे म्हटले आहे की या देशी व गावठी दारू विक्री मुळे गावातील व शेजारील गावातील सर्वसामान्य माणसे आणि तरुण, युवा वर्ग दारु पिऊन दारुच्या आहारी जाऊन सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांचे कुटुंब व संसार उद्‌धवस्त होत आहेत. व ही बाब सामाजिक सलोखा सार्वजनिक आरोग्य बिघडविणारी गंभीर स्वरुपाची बाब आहे. व अशा या समाज विघातक कृत्यास आणि अवैध धं‌द्यास लोकनिर्वाचीत सरपंच लोकसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचा वरदहस्त, संरक्षण आणि सहकार्य लाभले आहे. त्यांच्या सहकार्या शिवाय ती व्यक्ती तेथे अशा पध्दतीने व अवैध मार्गाचा अवलंब करून देशौ व गावठी दारू विक्री करुच शकत नाही. तेथेच तलाठी कार्यालय असून तेथे कायम खातेदार महिला/पुरुष शेतकरी वर्गाची ये-जा असते त्यामुळे महिला वर्गास या अवैध धंदयाचा आणि दारु पिऊन झिंगणाऱ्या तळिरामांचा व त्यांच्या कडून होणाऱ्या अश्लील, विभत्स भाषेचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय याच ठिकाणा पासून अंदाजे 50 फूट अंतरावर ईस्लाम धर्माची मशीद आहे तर अंदाजे 300/350 फूट अंतरावर गावांची ग्रामदेवता हानुमान मंदिर व इंतर देवदेवतांची मंदिरे, सार्वजनिक पानवठा, अंगणवाडी, व गावातील केंद्रीय प्राथमिक शाळा आहे. सदरचा परिसर हा कायम गजबजलेला व रहदारीचा परिसर आहे. त्यामुळे तेथे मधल्या सुट्टीत कायम वि‌द्यार्थी/वि‌द्यार्थिनीचा देखील वावर असतो. अशा गजबजलेल्या वस्तीत व परिसरात लोकनिर्वाचीत सरपंच/ग्रामविकास अधिकारी यांच्या सहकार्याने जर असा अवैध मार्गाने देशी व गावठी दारू विक्रीचा व्यवसाय चालत असेल तर ही वाव तितकीच गंभीर स्वरुपाची, गतीमान म्हणविल्या जाणाऱ्या सरकारची आणि आपल्या प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगणारी, प्रशासनाची जनमाणसात प्रतिमा मलीन करणारी गंभीर स्वरूपाची बाब आहे. तेव्हा नम्र विनंती की, सदरचा अवैध मार्गाने देशी व गावठी दारू विक्रीचा व्यवसाय तात्काळ बंद करून त्या अवैध धं‌द्यास संरक्षण देऊन सहकार्य करणाऱ्या सरपंच/ग्रामविकास अधिकाऱ्यास तात्काळ निलंबीत करुन त्यांच्या विरुद्ध फौजदारी कार्यवाहीसह शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा दि. 15.5.2025 पासून तलाठी कार्यालय, खालापुरी या कार्यालया समोर मी उपोपणास बसणार आहे. असा ईशारा नामदेव दगडू लोंढे यांनी तहसिलदार शिरूर कासार यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे . 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.