वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान..
लोहा : - तालुक्यातील निळा येथील शेतकऱ्याच्या शेतातील सौर पॅनेलचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची ... मागणी
सोमवारी सायंकाळच्या सुमारास नांदेड जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये अचानक वादळी वाऱ्याची सुरुवात झाली,काय करावे कुठे जावे ,आशि परीस्थिती निर्माण झाली शेती कुंपण ,काट्याचे फास, घरावरील पत्रे, शेतीमध्ये असलेल्या झोपडी वरील छप्पर हवेत उडत होते यातशेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . प्रचंड वेगाने असलेल्या वादळी वाऱ्यामुळे निळा ता.लोहा येथील भगवानराव इंगळे यांच्या सह अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सौर पॅनेलचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.
stay connected