मुलाच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप; पोलीस उपनिरीक्षक अजय लोहेकर यांचा अभिनव उपक्रम
लोहा, प्रतिनिधी
लोहा शहरातील भूमिपुत्र पुणे येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अजय लोहेकर यांच्या चिरंजीवाचा वाढदिवस लोहा शहरांमध्ये विविध समाजपयोगी उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालय लोहा येथे रुग्णांची विचारपूस करून त्यांना फळे वाटप करण्यात आले. यावेळी चि. अद्विक चे( पप्पा) अजय लोहेकर, सौं.अमिता अजय लोहेकर(आई) यामध्ये केळी व आंबे गरजू रुग्णांना वाटप करण्यात आले यावेळी डॉ. गणेश चव्हाण , परिचारिका व इतर कर्मचारी तसेच समाज बांधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
फळ वाटप कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी लोहा शहरातील जिजामाता मंगल कार्यालयात भव्य दिव्य अशा वातावरणात चि. अद्विक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. चि. अद्विक याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजय यादवराव लोहेकर (पप्पा) सौ .अमिता अजय लोहेकर(आई) यादवराव कांबळे (आजोबा) भगवान धोंडीबा कंधारे (आजोबा) सुधाकर यादव कांबळे( काका) शंकर यादव कांबळे (काका) गजानन कंधारे, प्रसन्न कंधारे (मामा) चांदु श्रीपती हजारे (नातेवाईक) तसेच नांदेड पोलीस दलातील कर्मचारी संजय जाधव सिंनगारपुतळे व समाज बांधव, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार नातेवाईक, इतर मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पत्रकारांचा हि शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
stay connected