*बुशरा शेख हिने यशवंत माध्यमिक विद्यालयात प्रथम क्रमांक पटकविला*
यशवंत माध्यमिक विद्यालयातील फकीरवाडा मुकुंद नगर
अहिल्यानगर या शाळेतील विद्यार्थिनी बुशरा आरिफ शेख हिने *एस.एस.सी. परीक्षा २०२५ मध्ये ९०%* गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. बुशरा ही आरिफ जैनुद्दीन शेख जिल्हा अध्यक्ष भूमी अभिलेख कास्ट्राइब महासंघ अहिल्यानगर महाराष्ट्र राज्य यांची मुलगी आहे. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रथम क्रमांक आल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापिका सौ. बनकर मॅडम , लवांडे सर , चाबुकस्वार सर, गुंड सर, आणि मा. अविनाश मिसाळ सर उपाधीक्षक भूमी अभिलेख अहिल्यानगर, मिलिंद भिंगारदिवे मुख्यालय सहाय्यक, रवी डिकृज शिरसेदार , कास्ट्राइब महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष एन.एम. पवळे सर व राज्य उपअध्यक्ष वसंत थोरात सर यांनी अभिनंदन केले व भावी शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
stay connected