अर्हम विज्जा प्रणेता उपाध्याय पू. प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांचे कडा नगरीमध्ये शुभागमन -
कडा- राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांचे सुशिष्य अर्हमं विज्जा प्रणेता प्रणेता प.पूज्य उपाध्याय श्री प्रवीण ऋषीजी महाराज साहेब व मधुर गायक पूज्य तीर्थेश ऋषीजी महाराज साहेब यांचे बुधवार दिनांक 7 मे 2025 रोजी कडा नगरीमध्ये आगमन होत आहे शतक महोत्सव चालू असलेल्या श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळामध्ये महान साधुसंतांचे शुभाशीर्वाद आणि पावन स्पर्श होत असल्यामुळे कडा नगरीमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पूज्य प्रवीण ऋषीजी म सा. यांच्या पावन सानिध्याचा व मार्गदर्शनाचा लाभ मिळवण्याची संधी सर्व गुरु भक्तांना चार वर्षांनी पुन्हा मिळणार आहे. पूज्य गुरुदेव "संकल्प मे सिद्धी है विकल्प मे व्याधी "या विषयावर प्रवचन देणार आहेत तरी या प्रवचनचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान कडा जैन संघाच्या वतीने करण्यात येत आहे.
अर्हम् विज्जा प्रनेता उपाध्याय पूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांचे बुधवारी सकाळी सात वाजता कडा येथील महादेव मंदिर येथे शुभागमन होणार असून तेथून बस स्टॅन्ड आंबेडकर चौक ,मेन रोड कडा मार्गे जैन स्थानकामध्ये शुभागमन होणार आहे .सात तारखेला सकाळी साडेआठ वाजता "संकल्प मे सिद्धी है! विकल्प मे व्याधी" या विषयावर परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांचे प्रवचन जैन स्थानकात होणार आहे. तसेच परमपूज्य महाराज साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी साडेनऊ वाजता जैन स्थानकामध्ये गौतम लब्धी कलश निधी संकलनचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी दोन ते चार या वेळेत महिलांसाठी धार्मिक चर्चा हा कार्यक्रम देखील जैन स्थानकामध्ये होणार आहे.सूर्यास्तनंतर प्रतिक्रमण व संध्याकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळेत प्रवचन जैन स्थानकामध्ये होणार आहे.
आठ मे रोजी परमपूज्य म .सा.यांचे सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळेत प्रवचन होणार आहे प्रवचनानंतर परम पूज्य श्री प्रवीण ऋषीजी म सा रायझिंग सन प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे एक दिवसीय शिबिर जैन स्थानकामध्ये घेणार आहेत. या शिबिराच्या कार्यक्रमानंतर सायंकाळी चार वाजता परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज साहेब व श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे माजी विद्यार्थी मधुर गायक पूज्य श्री तीर्थेश ऋषीजी महाराज साहेब यांचे अमोलक संस्थेमध्ये शुभागमन होणार आहे. अमोलक संस्थेमध्ये परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज साहेब हे संस्थेच्या नवीन इंजिनिअरिंग कॉलेजच्या इमारतीमध्ये मंगलाचरण एवं शुभ आशीर्वाद देणार आहेत हे सर्व कार्यक्रम श्री वर्धमान स्थानकवासि जैन श्रावक संघ कडा व श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहेत तरी या सर्व कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी विनंती समस्त जैन श्रावक संघ व श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे
stay connected