अमोलक बी.फार्मसी महाविद्यालयामध्ये पूल कॅम्पस ड्राइव्ह यशस्वीरित्या संपन्न

 अमोलक बी.फार्मसी महाविद्यालयामध्ये पूल कॅम्पस ड्राइव्ह यशस्वीरित्या संपन्न

-----------------------------------





आष्टी(प्रतिनिधी)

 २८ मे रोजी श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर, कडा (बी. फार्मसी) येथे पूल कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमाच्या माध्यमातून फार्मास्युटिकल क्षेत्रातील Regulatory Affairs, ADL, F&D, Production, QA आणि QC या विभागांमध्ये Trainee Officer या पदांसाठी एकूण २३ रिक्त जागांसाठी मुलाखती घेण्यात आल्या.या कॅम्पस ड्राइव्हमध्ये एकूण ७८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये अमोलक बी. फार्मसी महाविद्यालयाचे ३४ विद्यार्थी तसेच महाराष्ट्रातील विविध फार्मसी महाविद्यालयांतील ४४ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.Baroque Pharmaceutical Pvt. Ltd., सोखाडा, ता.खांभात, जि.आनंद, (गुजरात) या नामवंत कंपनीकडून विविध पदांसाठी  ६४ विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. Regulatory Affairs विभागासाठी JVAG Pharma Consultant, पुणे या कंपनीने ३१ विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली.



Baroque Pharma कंपनीकडून  धवल पटेल (प्रमुख – प्रोडक्शन विभाग) व HR  हार्दिक पटेल यांनी Regulatory Affairs, ADL, F&D, Production, QA, QC या विभागांतील trainee officer पदांसाठी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या.JVAG Pharma Consultant, पुणे कंपनीतर्फे CEO विश्वेश्वर संगमुळी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने Regulatory Affairs विभागासाठी मुलाखती घेतल्या.महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना Theory ज्ञानाबरोबरच practical skills आणि संशोधनासाठी (Research) प्रोत्साहन दिले जाते. येथे संशोधन केंद्र उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनविषयक दृष्टीकोन अधिक दृढ होतो.

संस्थाध्यक्ष,उपाध्यक्ष, प्रधानमंत्री, कोषाध्यक्ष, सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गफ्फार सय्यद,Training & Placement Officer प्रा.प्रशांत तांदळे, प्रा.आकाश काळे सर इतर प्राध्यापक वर्ग व यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले.या यशस्वी उपक्रमाबद्दल प्राचार्य डॉ. सय्यद यांनी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.