टाकळी अमीया येथे प्रसुतीसाठी महिलेचा बाजेवरून जीवघेणा प्रवास
आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील शेत वस्तीवर जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे महिलेला प्रसुतीनंतर उपचारासाठी एक किलोमीटर बाजेवरून प्रवास करावा लागला. या प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समाजातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.
व्हिडीओ पहा📽️👇
टाकळी अमिया येथील ससाणे वस्तीपर्यंत पोहचण्यासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. वेशीपासून वस्तीपर्यंतचा रस्ता खड्डेमय असून, पावसात पूर्णतः खराब झाला आहे. अशा स्थितीत आजारी व्यक्ती आणि गरोदर महिलांची तातडीने वैद्यकीय मदत मिळणे जवळपास अशक्य झाल्याने नातेवाईकानी प्रसुती साठी एक किलोमीटर बाजेवर आणल्याचा प्रकार आष्टी तालुक्यात समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर येथील या वस्तीवरील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते सावता ससाने यांनी गावातील सर्व वस्ती ठिकाणी तातडीने सर्वेक्षण करून रस्ते उपलब्ध करावेत, तसेच गरोदर महिलांसाठी तातडीची रुग्णसेवा पोहचवावी. त्यांनी प्रशासनाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले असून, लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. ग्रामीण भागात रस्त्यांचा अभाव आणि आरोग्यसेवांचा अपुरा पुरवठा ही आजही मोठी समस्या असून, संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
stay connected