*आदर्श शिक्षिका कवयित्री शेख नजमा मैनुद्दीन यांच्या कविता कथा आकाशवाणीवर*
______________________________________
श्रीमती शेख नजमा मैनुद्दीन सहशिक्षिका जि प कें प्रा शा वहाली येथे कार्यरत आहे. शेख नजमा यांच्या निवडक कविता आणि कथा भारत सरकार अंतर्गत रेडिओ केंद्र आकाशवाणी बीड येथून सात जून 2025 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता अक्षर लेणी या साहित्य विषयक कार्यक्रमांतर्गत प्रसारित होणार आहेत. याचा लाभ रसिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. शेख नजमा यांचा फुलांची शाळा हा काव्यसंग्रह आणि अधुरे स्वप्न हे कथासंग्रह प्रकाशित आहे तसेच श्रीमती शेख नजमा यांनी अनेक राज्यस्तरीय कवी संमेलनात तसेच कथा संमेलनात सहभाग घेतलेला आहे उत्कृष्ट कविता सादर केलेले आहेत.
या अगोदर पूर्ववत प्रा शा वाळकेवाडी येथील मंगेश वाळके चा साता समुद्रा पल्याड व्हायरल निबंध *माझे पप्पा* आकाशवाणी केंद्र बीड येथून प्रसारित झाला होता. मराठवाडा साहित्य संमेलनात मराठवाड्यातून कथालेखन स्पर्धेत वाईट नजर या कथेला तृतीय क्रमांक मिळवला होता.
राज्यस्तरीय जिल्हास्तरीय कविता कथालेखनात त्यांनी अनेक पारितोषिक मिळवले आहेत तसेच विविध संस्थेचे प्रतिष्ठानचे 100 सन्मान पुरस्कार झालेले आहेत. त्यांनी आजवर 1000 च्या वर कविता लेखन केलेल्या आहेत तसेच कथा चारोळ्या लेखनही केलेले आहे लेखनाचा छंद जोपासलेला आहे.
सलग पाचव्यांदा त्यांच्या भारत सरकार अंतर्गत बीड आकाशवाणी केंद्रातर्फे अक्षर लेणी या साहित्य विषयक कार्यक्रमांतर्गत शेख नजमा यांच्या कथा आणि कविता सात जून 2025 रोजी सकाळी अकरा वाजता प्रसारित होणार आहेत. सर्व रसिकांनी या कथा आणि कविता सादरीकरणाचा आनंद घ्यावा. शेख नजमा मॅडम यांनी जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य तर्फेही वाचन लेखन चळवळीत सहभाग घेतलेला आहे त्या जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्याच्या बीडच्या सहसंपादिका आहेत. या सर्व यशात पती श्री समीर शब्बीर सय्यद यांचे सहकार्य मार्गदर्शन लाभले. तसेच नजमा शेख ह्या वडिलांच्या स्मरणार्थ सामाजिक उपक्रम अंतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवरांना आदर्श पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण करणाऱ्या एकमेव शिक्षिका आहेत.
ज्ञानदानासोबतच साहित्य आणि सामाजिक कार्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या श्रीमती शेख नजमा मैनुद्दीन यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
आकाशवाणीच्या प्रसारणासाठी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री बोंडार्डे धनंजय साहेब, केंद्रप्रमुख श्री घुमरे राजेंद्र , प्राध्यापक डॉक्टर जमीर सय्यद सर वहालीचे मुख्याध्यापक श्री बनकर सोनाजी सर, श्री समीर सर, श्री नईमभैय्या शेख, साहित्यिक श्री अनंत कराड सर आकाशवाणीचे ठाकूर साहेब सर्वांनीच अभिनंदन केले आहे. तसेच पुढील सामाजिक शैक्षणिक साहित्यिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
stay connected