डॉ.सय्यद हुमायुद्दीन यांचा जशने शादी सोहळा थाटात संपन्न

 डॉ.सय्यद हुमायुद्दीन यांचा जशने शादी सोहळा थाटात संपन्न ...............                     

                   

आष्टी प्रतिनिधी                                      

 आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा.तथा प्रसिद्ध कवी सय्यद अल्लाउद्दीन यांचे चिरंजीव तथा आष्टी येथील सय्यद डेंटल क्लिनिकचे डॉ.सय्यद हुमायुद्दीन यांचा विवाह औ,बाद अर्थात छ.संभाजीनगर येथील डॉ.शेख अब्दुल कादर कादरी यांची कन्या डॉ.मेहवश गौसिया हिच्याशी बुधवार दिनांक सात मे 2025 रोजी शहनाज फंक्शन हॉल येथे थाटात संपन्न झाला.यावेळी सय्यद आणि शेख परिवारातील आप्त,स्नेही त्याचबरोबर न्यायालयाचे न्यायमूर्ती,मुंबई येथील कन्स्ट्रक्टर मलिक साहेब,पुणे येथील व्यावसायिक सय्यद मगदूम, डॉ.मुजाहिद,प्रा.नरहरी पवार,प्रा.अशोक भोगाडे,प्रा.अनंत देशमुखे,तात्यासाहेब शेंडगे, सचिन रानडे,चिंचाळा येथील माजी सरपंच अशोक पोकळे,दिगंबर पोकळे,गणेश धुमाळ,आत्माराम पोकळे पाटील,सोमीनाथ पोकळे,राजकुमार पोकळे,गौरव राजे निंबाळकर,अंबादास पोकळे,अनेक ग्रामस्थ,मित्रपरिवार,रामकृष्ण हॉस्पिटलचे डॉ.संदीप हंबर्डे,डॉ.सायंबर तसेच पुणे,मुंबई,श्रीरामपूर,मराठवाड्यातील अनेक मान्यवर आणि कवी,साहित्यिक उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.