हंबर्डे कॉलेजचे दोन मावसभाऊ विद्यार्थी जीवशास्त्रात नव्वदी पार .................
आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी. हंबर्डे महाविद्यालयाने इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले असून,पठाण आर्शान इम्रान आणि सय्यद अमन अल्ताफ या दोन सख्या मावस भावांनी जीवशास्त्र विषयात अनुक्रमे 91आणि 94 गुण मिळवून नव्वदी पार केली आहे.त्यांच्या या यशात प्रा.सचिन कल्याणकर,प्रा.चंद्रकांत मडके,प्रा.संजय भांडवलकर, प्रा.विष्णू चौधरी,प्रा.संजू कोल्हे,प्रा.चंद्रकांत कोकणे,प्रा.जितेंद्र राळेभात,प्रा.बबन उकले, प्रा.विजय गव्हाणे,प्रा.राजेंद्र करांडे,प्रा.अनंत खोसे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.जीवशास्त्रात दोन्ही मावस भावांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,अतुल शेठ मेहेर, दिलीप शेठ वर्धमाने,डॉ.प्रताप गायकवाड,डॉ.गणेश पिसाळ,सुभान शेठ पठाण,प्रा.महेश चवरे आणि सर्व संचालक मंडळ,प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे,उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे,उपप्राचार्य अविनाश कंदले,पर्यवेक्षक प्रा.अशोक भोगाडे,कार्यालयीन अधिक्षिका सरस्वती जाधव यांनी अभिनंदन केले आहे.कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन हे या दोन्ही विद्यार्थ्यांचे काका आहेत.
stay connected