खरीप हंगामासाठी,दर्जेदार बियाणे आणि योग्य दरात खते उपलब्ध करून द्या..
पीक कर्ज वेळेत वितरित करा..आ.सुरेश धस यांच्या खरीप आढावा बैठकीत सूचना..
*****************************
******************************
आष्टी (प्रतिनिधी)
यावर्षी समाधानकारक पाऊस पडणार असल्याचे सांगितले जात असल्यामुळे पुरेसा पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांना पेरणीसाठी दर्जेदार बी बियाणे आणि योग्य दरात खते उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने नियमांचे काटकर होणे पालन करावे बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत वाटप करावे कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म नियोजन करावे. शेतकऱ्यांपर्यंतच्या बांधावर पोचून त्यांना मार्गदर्शन करावे असे सूचना आमदार सुरेश धस यांनी तालिकास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीमध्ये सर्व खातेप्रमुखांना दिल्या आहेत.
या आढावा बैठकीसाठी पाटोदा उपविभागीय अधिकारी वसीमा शेख,आष्टी तहसीलदार वैशाली पाटील, कृषी अधिकारी सुभाष साळवे, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे,आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी,पाटोदा तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके,शिरूर कृषी अधिकारी पवार आष्टीचे नगराध्यक्ष जिया बेग उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,
मतदार संघातील आष्टी, पाटोदा आणि शिरूर (कासार )या तीन ही तालुक्यासाठी बियाणे उपलब्ध व्हावेत म्हणून आष्टी बफर स्टॉक (रॅक पाॅईट) करण्यासाठी आपण वरिष्ठांशी चर्चा करणार असून,खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत व माफक दरात दर्जेदार खते, बी-बियाणे मिळतील याची खात्री करा, यासाठी वेळोवेळी निविष्ठांची तपासणी करा असे सांगत
आ.सुरेश धस म्हणाले..ऊस, ज्वारी, सोयाबीन, भुईमूग व कडधान्य पिकांसाठी खरीप हंगामात पाऊस चांगला होईल,असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे; परंतु पाऊस कमी झाला तरीही उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म नियोजन करा...मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना आवश्यक ते सहकार्य करा. २०२५-२६ मध्ये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा.मतदार संघातील शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व योजनांची माहिती देऊन शासकीय योजनांचा लाभ,विमा सुरक्षा मिळवून द्या.तसेच पीक कर्ज मुदतीत वितरित करा.स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेसह शेतकऱ्यांशी संबंधित सर्व प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढा.शेतकऱ्यांना विम्याची रक्कम व कर्जवाटप मुदतीत करा.शेतकऱ्यांना मशागत व पेरणी पूर्व मार्गदर्शन करा.क्षारपड जमिनीत सुधारणा होण्यासाठी तसेच या जमिनीची उपयुक्तता वाढविण्यासाठी उपाययोजनांवर भर द्या.मतदारसंघातील रेशीम उत्पादकता वाढविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार अंमलबजावणी करा.’
आष्टी पाटोदा व शिरूर कासार तालुक्यातील लागवडी लायक हेक्टरी क्षेत्र,आणि त्या क्षेत्रामध्ये पिकांनुसार लागवड योग्य क्षेत्र व त्या प्रमाणात उपलब्ध होणारे खत व बियाणे यांच्या बाबतचा तुटवडा तसेच आष्टी पाटोदा व शिरूर तालुक्यासाठी खत व बियाणांसाठी महामंडळाचा असणारा रॅक पॉइंट हा परळी या ठिकाणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आष्टी पाटोदा व शिरूर तालुक्याला खतांचा दरवर्षी तुटवडा जाणवतो त्यामुळे याबाबत संबंधितांशी बोलून आष्टी मतदार संघासाठी आष्टी येथे नवीन रॅक पॉईंट मिळवण्यासाठी योग्य पाठपुरावा करण्याबाबत चर्चा झाली आहे तसेच बीज प्रक्रिये बाबत शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक अधिकारी यांच्याकडून योग्य ती माहिती व त्यासाठी लागणारे औषधे उपलब्ध होत नाहीत व कृषी सहाय्यकांकडून प्रात्यक्षिक दिले न गेल्यामुळे अनेक शेतकरी कुठलीही बीज प्रक्रिया न करता आपल्या बियाणांची शेतामध्ये पेरणी अथवा लावणी करतात तसेच शिरूर कासार तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती तूर आणि कापूस हे प्रमुख पीक घेतले जाते परंतु एकाच कंपनीचे बियाणे कृषी विक्रेत्यांच्याकडून वारंवार शेतकऱ्यांना दिले जाते त्यामुळे कापूस व तूर या पिकाची दरवर्षी मिळणारे सरासरी यामध्ये तफावत येत आहे .त्यामुळे कृषी विक्रेत्यांना विनंती आहे की वेगवेगळ्या प्रजातीच्या बियाणांची आपण शेतकऱ्यांना माहिती देऊन ते लागवड करण्यासाठी व पेरणीसाठी प्रोत्साहित करावे..
आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर खते व बियाणांचे लिंकिंग स्वरूपात विक्री सुरू आहे उदाहरणार्थ ज्या शेतकऱ्यांना युरिया घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांना नॅनो
युरियाची बॅग घेणेबाबत सक्ती होत आहे
एका खताच्या कंपनीबरोबर दुसऱ्या कंपनीचे खत घेणे बंधनकारक केले जात आहे ही बाब गंभीर आहे
त्यामुळे सर्व कृषी सेवा केंद्र यांना विनंती आहे की शेतकऱ्यांची अडवणूक करू नका. यासह खरीप हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांच्या बाबतीत पडणारी कीटकनाशके रोगराई व त्याबाबत फवारणी करण्यासंदर्भातील बायो ऑरगॅनिक औषधे याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जावा रासायनिक औषधांचा व केमिकल युक्त औषध व फवारणी साठी लागणाऱ्या पावडर ह्या कमी प्रमाणात वापरल्या जाव्यात.. यासाठी कृषी विभाग व त्या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी शेतकऱ्यांना जागृत करणे आवश्यक असल्याचे सांगितले
यावेळी बियाणे उगवणक्षमता व बीजप्रक्रिया याबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. शेतीमधील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी घरचं बियाणे उगवण क्षमता तपासून पेरणीसाठी वापरावे तसेच बियाण्याला रासायनिक किंवा जैविक कीटकनाशके, बुरशीनाशके व जैविक घटकांची बीजप्रक्रिया केल्याने उगवण क्षमता चांगली होते तसेच रोपावस्थेतील कीड व रोगांचे प्रमाण कमी होते.
त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी असे आवाहन मा. आ. सुरेश धस यांनी शेवटी केले.
-----------
कृषी सहाय्यक यांनी बांधावर जावे
-------------------------------
शेतकऱ्यांना कृषी योजनेची माहिती देण्यासाठी दुपारी ११ वा.नाही तर सकाळी ७-८ वा.जाऊन माहिती देणे गरजेचे असताना हे कृषी सहाय्यक वेळेचे बंधन ठेवत नाहीत.अशा कृषी सहाय्यक,कृषी मंडळ अधिकारी यांच्यावर तालुका कृषी अधिकारी यांनी ठेवणे गरजेचे आहे.पण आता यावर जर कुणाचा वचक राहिलेला नाही. परंतु जर कुणी कामात हलगर्जीपणा केला तर कुणाचीही गय केली जाणार नाही.कृषी सहाय्यक यांनी बांधावरच जावे अशी सूचना आ. सुरेश धस यांनी दिल्या.
stay connected