ऑपरेशन सिंदूर - धर्मांततेला चपराक

 *ऑपरेशन सिंदूर - धर्मांततेला चपराक.*

✍🏻



           *युन्नूस तांबोळी,* *अकलूज* .

 

  पहेलगाम हल्ल्याचा बदला, म्हणून ऑपरेशन सिंदूर ची यशस्वी कामगिरी,या कामगिरी करणाऱ्या भारतीय लष्करातील सेना दलाच्या कर्नल सोफीया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमीका सिंग यांनी धर्मांततेचा पुरस्कार करणाऱ्यांना जोरदार चपराक दिलेली आहे.

     धर्माच्या नावावर गोळ्या घालणार्या आणि धर्म पाहून खरेदी करा म्हणणारी जमातीच्या थोबाडीत दिलेली जोरदार चपराक आहे.ज्यावेळी देशांवर संकट येते, त्यावेळी एखाद्या धर्माविषयी संशय व्यक्त करणारी प्रवृत्तीला मिळालेले उत्तर आहे.

   "ऑपरेशन सिंदूर"कर्नल सोफीया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमीका सिंग यशस्वी करून भारतीय हवाई दलाने पाक पुरस्कॗत दहशतवादी तळांवर हल्ला करून दहशतवादी कॗत्य करणार्यांना उत्तर दिले.

     भारतीय नागरिकाला राज्य घटनेने दिलेले सार्वभौम स्वातंत्र्य,दर्जाची व संधीची समानता, राष्ट्रीय एकता व एकात्मता तसेच संविधानीक धर्मनिरपेक्षच्या दॄष्टीने ही एक नितांत सुंदर गोष्ट आहे 


   उठसुठ धर्मांधर्मांत जातीय तेढ निर्माण करणारी मंडळी , एखाद्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणणे, महिलांना टिकली लावण्याचा उपदेश करणार्या आंबापुत्राला तोंड काळे करायला लावणारी ही घटना आहे.

      राज्यकर्त्यांच्या हातातील बाहुले बनून हिंदू -मुस्लीम द्वेश जातीय तणाव निर्माण करणार्या धर्मांध समाजकंटकांनी लाजीरवाणे होऊन शरमेने मान खाली घालावी अशी ही घटना आहे.

    ज्यावेळी देशांवर संकट येते त्यावेळी या देशातील बांधव धर्मापेक्षा देशाला प्राधान्य देतो हे लक्षात ठेवावे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.