अकलूज येथे "मोफत लठ्ठपणा तपासणी शिबिर
आदरणीय केमिस्टहृदयसम्राट मा.आ. जगन्नाथ (आप्पा )शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे ,अकलूज येथे "मोफत लठ्ठपणा तपासणी शिबिर", घेण्यात आले ,
दीपप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी AIOCD LTD चे डायरेक्टर व MSCDA चे निमंत्रित सदस्य श्री बसवराज मणूरे व पश्चिम महाराष्ट्र व जिल्हा संघटनेचे खजिनदार श्री प्रशांत खलीपे तसेच डॉ. वंशपायन मेमोरियल मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता
डॉ.संजीव ठाकूर व प्रोफेसर
डॉ.अमेय ठाकूर
(बेरियट्रिक सर्जन),मोहोळ तालुका संघटनेचे सदस्य श्री सचिन शास्त्री तसेच डॉ.संचित खरे व माळशिरस तालुका संघटनेचे अध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड उपस्थित होते. प्रस्ताविक विठ्ठलराव गायकवाड यांनी केले यावेळी श्री बसवराज मणूरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व
डॉ.संजीव ठाकूर यांनी उपस्थित रुग्णांना बेरियट्रिक सर्जरी व सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे होणाऱ्या इतर सर्व लॅप्रोस्कॉपिक शस्त्रक्रिया बद्दल माहिती दिली ,
सदर शिबिरामध्ये जवळपास 100 रुग्णांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी ज्या रुग्णांना गरज आहे अशा रुग्णांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर ,येथे मोफत ऍडमिट होण्याचा व शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला देण्यात आला ,
सदर शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी माळशिरस तालुका संघटनेचे श्री विजय जगताप, श्री नितीन दोशी, श्री शुभम चव्हाण श्री तुषार बेंद्रे आणि अनेक सभासदांनी अथक प्रयत्न केले...
stay connected