वंजारवाडीच्या.. मयत वारसांना आणि जखमींना अर्थसहाय्य मंजूर करावे..मुख्यमंत्र्यांकडे..आ.सुरेश धस यांची मागणी

 वंजारवाडीच्या.. मयत वारसांना आणि जखमींना अर्थसहाय्य मंजूर करावे..मुख्यमंत्र्यांकडे..आ.सुरेश धस यांची मागणी

*******************************



*******************************

आष्टी (प्रतिनिधी)

आष्टी तालुक्यातील मजूर महिला पुरुष आणि बालकांसह वंजारवाडी येथून कडा येथे जात असताना सकाळी १०.५० या वेळी देवीनिमगाव या गावाजवळ हे पिकअप वाहन टायर फुटल्याने उलटले दोन तीन पलट्या झाल्या या  अपघातामध्ये अजित विठ्ठल महाजन वय १४  वर्षे, कु.श्रावणी विक्रम महाजन वय १३ वर्षे, आणि कु.ऋतुजा सतीश महाजन वय १६ वर्षे यांना जबर मार लागल्याने ते मयत झाले तर २० जखमी झाले.कामगार दिनी रस्ता अपघातामध्ये मयत झालेल्या ३ मजुरांच्या वारस कुटुंबियांना आणि जखमी मजुरांना मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधी द्वारे अर्थसाह्य मंजूर करावे अशी मागणी पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आष्टी,पाटोदा,शिरूर मतदारसंघाचे आ.सुरेश धस यांनी केली आहे.




       आष्टी विधानसभा मतदारसंघातील.. वंजारवाडी ता.आष्टी जि.बीड येथील महिला, पुरुष हे मजूर दि.१ मे २०२५ रोजी आपल्या मुलांसह कांदा भरण्यासाठी श्री. दिलीप विलास महाजन यांच्या पिकअप वाहन क्र.एम.एच.-१- एल- २६८५ या वाहनाद्वारे..वंजारवाडी येथून कडा येथे जात असताना सकाळी १०.५० या वेळी देवी निमगाव या गावाजवळ हे पिकअप वाहन उलटले..दोन तीन पलट्या झाल्या या  अपघातामध्ये.. अजित विठ्ठल महाजन वय १४  वर्षे, कु.श्रावणी विक्रम महाजन वय १३ वर्षे, आणि कु.ऋतुजा सतीश महाजन वय १६ वर्षे यांना जबर मार लागल्याने ते मयत झाले असून कु पल्लवी सतीश महाजन, शकुंतला सूर्यभान नरवडे, आशाबाई पोपट नरवडे, गीताबाई आजिनाथ नरवडे अर्चना नितीन नरवडे, कांताबाई ज्ञानदेव महाजन, स्वाती दिलीप महाजन, शांताबाई नरवडे, अंकिता  बन्सी नरवडे, नंदा नितीन नरवडे, संगीता अशोक महाजन, आशाबाई बाळू महाजन, द्वारकाबाई बबन महाजन, वैष्णवी बाळू नरवडे, सुलाबाई पोपट महाजन, शीतल पोपट नरवडे, मनीषा शिवनाथ गोरे, धोंडाबाई नितीन नरवडे, सिंधुबाई ज्ञानदेव महाजन, श्रावणी दिलीप महाजन, आणि राजश्री विठ्ठल महाजन सर्व रा.वंजारवाडी ता.आष्टी जि.बीड हे जखमी झाले आहेत हे सर्व मजुरी करणाऱ्या वर्गातील ग्रामस्थ असून जबर जखमी झाल्यामुळे काम करता येणार नसल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणी येणार आहेत..कामगार दिनी झालेल्या अपघातामधील  मयत ३ व्यक्तींच्या वारस कुटुंबियांना आणि २० जखमी झालेल्या मजूर नागरिकांविषयी अत्यंत सहानुभूतीपूर्वक विचार होऊन त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीद्वारे अर्थसहाय्य मंजूर करण्यात यावे..या साठी जिल्हाधिकारी,बीड यांच्या मार्फत प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून अर्थसहाय्य मंजूर करावे अशी विनंती आ.सुरेश धस यांनी केली आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.