वडार समाज महाराष्ट्र मजुर शिल्प प्रतिष्ठाणच्यावतीने कामगार दिनादिवशी पुरस्कार सोहळा संपन्न

 वडार समाज महाराष्ट्र मजुर शिल्प प्रतिष्ठाणच्यावतीने कामगार दिनादिवशी पुरस्कार सोहळा संपन्न

**********************************



**********************************

आष्टी (प्रतिनिधी)

पिंपरी चिंचवड येथील वडार समाज महाराष्ट्र मजुर शिल्प प्रतिष्ठाण चिंचवड या सामाजिक संस्थेकडून १ मे कामगार दिनानिमित्त  वडार समाज मजुर शिल्प समाज बांधवांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते संतोष मुरकुटे व संस्थेचे उपाध्यक्ष सचिन चौगुले यांच्या सौजन्य लाभले.हा सोहळा बर्ड व्हाॅली गार्डनमध्ये मोठ्या थाटात संपन्न झाला.

खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या शुभ हस्ते वडार मजूर दाम्पत्याला शिल्प पुष हार अर्पण

राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  प्रतिभाशाली महिलांना व पुरुषांना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन पुरस्कृत करण्यात आले.विधानपरिषदचे आमदार  मा अमित गोरखे ,माजी उपमाहापौर मा. श्री. तुषारभाऊ हिंगे, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री एस. एन. पवार (सेवानिवृत्त शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य) स्वागताध्यक्ष मा शशिकांत लष्करे,विशाल काळभोर, मी वडार महाराष्ट्राचा प्रदेश कार्याध्यक्ष मा.सुरेश धोत्रे मा. भरत विटकर, शिरूर काॅग्रेस महिला अध्यक्षा सौ प्रियांका बंडगर मा. उद्योगपती मा.रमेश शिंदे, मा राकेश विटकर,मा.सुरेश कुराडे,1जेष्ठ साहित्यिक मा टी. एस. चव्हाण, स्विकृत नगरसेविका कु अपर्णाताई कुराडे,मा. विठ्ठल मोरे,ललिता धनावडे, मारुती धोत्रे,शाम पवार,

अशोक पवार, हरीश बंडीवडार आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिभाशाली महिलांना व पुरुषांना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन पुरस्कृत करण्यात आले. तसेच समाज रत्न पुरस्कार म्हणून सौ. निर्मलाताई कुराडे श्रीमती, सुनीता जाधव, श्री. यल्लाप्पा कुसाळकर तर समाज गौरव म्हणून श्री. लहू बंदपट्टे, काशिनाथ आनंदकर सोलापूर चंदर मुधोळ, पुणे, सौ.उज्वला पवार,धाराशिव,,बाळु दांडेकर, पुणे, अशोक जाधव, पुणे, चंद्रकांत जाधव, कोल्हाट,निखिल आळकुंटे, पुणे,वसंत पवार, नवी मुबंई गुण गौरव पुरस्कार,कु.डॉ. स्वजल जाधव,कु.सोनु आनंद मोरे (पोलीस)कु. सोनाली संदीप शिंदे,खाण कामगार जेष्ठ नागरिक सन्मान करू तुकाराम शेलार, म्हादू वेताळ यांनी पुरस्काराने सन्मानित केले आहे. या पुरस्कारासाठी सौजन्य म्हणून संतोष आण्णासाहेब मुरकुटे,संस्थेचे उपाध्यक्ष सचिन चौगुले यांचे लाभले व विशेष सहकार्य विष्णु चौगुले यांनी केले.



संयोजक उपाध्यक्ष सचिन चौगुले, अमर दौंडकर, राजु कुसाळकर,अनिल विटकर,अनंत नलावडे,अक्षय पवार,अक्षय कुसाळकर यांनी संयोजक म्हणून काम पाहिले तर प्रास्ताविक शामराव विटकर व आभारप्रदर्शन लखन पाटकर यांनी केले.या पुरस्कार सोहळ्यासाठी समाज बांधव व भागिनी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.