*शासनाच्या अनेक हितकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहविणार--आ.सुरेश धस*
***********************************
कुसळंब येथे माऊली जरांगे यांच्या प्रयत्नाने आयोजित बांधकाम कामगारांना साहित्य वाटप
*******************************
***************************
आष्टी (प्रतिनिधी)
बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे,कामगारांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करणे हे यासह अन्य फायदा मिळवून देणं हे या योजनेच मूळ वैशिष्ट असून त्यासाठी ही योजना आहे याचा फायदा सर्वांनी घ्यावा असे आवाहन परंतु यामध्ये वंचित असलेला मजूर कामगार याला या योजनेचा प्राधान्याने फायदा झाला पाहिजे. शेवटी अंत्योदय म्हणजे समाजातील शेवटच्या घटका पर्यंत शासनाच्या योजनेचा फायदा हा सर्वसामान्यांना झाला पाहिजे त्यासाठी असे कार्यक्रम वेळोवेळी घेण्याचे काम माऊली जरांगे करतात ही चांगली बाब असल्याचे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले.
पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथे आयोजक अंमळनेर जिल्हा परिषद गटाचे सदस्य माऊली जरांगे यांच्या प्रयत्नातून आयोजित बांधकाम मजुरांना महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारास घरगुती भांडी व बांधकाम साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर बांधकाम कामगार व्यवस्थापक विक्रांत वीर साहेब,आयोजक जि.प.सदस्य माऊली जरांगे,सभापती किरण शिंदे पाटील,दिलीप भराटे,गोविंद गाडे, महेश खेगंरे,शाहुराव टेकाळे, श्रीहरी गिते, रामेश्वर गोरे,दादासाहेब पवार,भारत मानमोडे,गोवर्धन सुळे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ.धस म्हणाले की,शासनाच्या अनेक हितकारी योजना असून 2002 साली मी गाळ उपसा योजनेला आष्टी मध्ये सुरुवात केली त्यानंतर ही योजना शासन स्तरावर अंमलात आणण्यात आली. शेतकऱ्यांच्या शेतीला उन्नत करण्यासाठी शेत शिवार पोषिक करण्यासाठी तलावातील गाळ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,शिवाय यामुळे गाळ उपसा झाल्याने या तलावातील पाणी पातळी वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे ही आ.सुरेश धस म्हणाले.
यावेळी माऊली जरांगे बोलताना म्हणाले,
आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक योजना शेतकरी असो की,सर्वसामान्य नागरिक प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्यासाठी काम आम्ही कार्यकर्ते करत असतो.यामध्ये कधीच राजकारण करत नाही.प्रत्येक योजना प्रत्येक घटकापर्यंत पोहचवीत आहोत.सामान्य माणूस आहे आणि ही योजना त्यांच्या पर्यत आ.धस यांच्या आदेशाने ती पोहच करणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.
यावेळी अंमळनेर जिल्हा परिषद गटातील नागरिक व लाभार्थी तसेच कुसंळब ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected