शेख सलमान यांचा त्रिदल माजी सैनिक सेवा संघातर्फे सत्कार

 शेख सलमान यांचा त्रिदल माजी सैनिक सेवा संघातर्फे सत्कार





आष्टी तालुक्यातील धानोरा येथील माजी सैनिक शेख मुनिरभाई व प्राथमिक शिक्षिका ताहेरा मॅडम यांचे चिरंजिव शेख सलमान मुनीर यांची MPSC मार्फत महसूल सहाय्यक पदी अप्पर कार्यालय आदिवासी विकास विभाग ठाणे येथे निवड झाल्याबद्दल सोमवार दि . 21 रोजी त्रिदल सैनिक संघटना आहिल्यानगर व आष्टी तालुका यांच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .ऑनररी कॅप्टन आब्बास शेख यांच्या विशेष प्रयत्नाने त्रिदल माजी सैनिक सेवा संघ अहिल्यानगर व त्रिदल माजी सैनिक सेवा संघ आष्टी यांनी एकत्रित येऊन हा सत्कार केला. 



यावेळी त्रिदल माजी सैनिक सेवा संघ अहिल्यानगर चे अध्यक्ष श्री बाळासाहेब आंधळे साहेब, त्रिदल ऊप अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य क्रीडा अध्यक्ष हरिभाऊ चिरके, खजिनदार रामदास पालवे , त्रिदल डायरेक्टर तथा पवार मोटा उद्योजक श्री शांतिलाल पवार साहेब, ऑनररी कॅप्टन मनोहर उबाळे साहेब, सुभेदार तुकाराम जाधवर साहेब, गणेश भा॑बे साहेब, सुभेदार घायाळ साहेब, हवालदार धनाजी शिंदे साहेब, अविनाश कांबळे साहेब, सुभेदार चेंडे साहेब, क्रिकेट खेळाडू अकाडमीचे संचालक श्री बाजीराव गोपाळघरे साहेब, शेकडे साहेब, कांबळे साहेब, सुभेदार विनायक मोराळे साहेब, शिवानंद वायभासे साहेब, सुभेदार आजीनाथ गोपाळघरे साहेब, सुभेदार रामकीसोर वर्मा साहेब, त्रिदल कुशल संघटक महाराष्ट्र राज्य तथा कोरकमेटी अध्यक्ष बीड जिल्हा श्री ऑनररी कॅप्टन आब्बास शेख साहेब, त्रिदल माजी सैनिक सेवा संघ आष्टी सचिव ऑनररी कॅप्टन आकबर  बेग साहेब, त्रिंबक जगदाळे साहेब त्रिदल अध्यक्ष आष्टी श्री ऑडोव्होकेट ज्ञानेश्वर भोसले साहेब, कार्यकारी अध्यक्ष रामेश्वर यादव साहेब,काकासाहेब खेडकर साहेब तसेच मोठ्या प्रमाणात महीलाम॑डळ  तथा गणमान्य माजी सैनिक उपस्थित होते.  याप्रसंगी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हाजी असलम सर यांनी केले . तर कॅप्टन बाळासाहेब आंधळे यांनी माजी सैनिकांच्या प्रत्येक कार्यात त्रिदल संघटना सक्रिय सहभागी असते . माजी सैनिकांच्या मुलांनी उच्च पदावर नियुक्ती मिळवावी अशी अपेक्षा व्यक्त करत शेख सलमान याला  शुभेच्छा दिल्या . 



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.