गौरगांव मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी
(तासगाव प्रतिनिधी)
जिल्हा परिषद शाळा गौरगांव, ग्रामपंचायत कार्यालय गौरगांव आणि भीम गर्जना युवा मंच गौरगांव येथे विश्वरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 135 सावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
जिल्हा परिषद शाळा गौरगांव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने यावेळी आदर्श मुख्याध्यापक सुधाकर बनसोडे, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित आणि विविध बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डधारक साहित्यिक नवनाथ रणखांबे, भीम गर्जना युवा मंचचे अध्यक्ष रविंद्र माने , पवन खराडे, भीमगर्जना युवा मंच सल्लागार मारुती माने , दिलिप माने, साहेबराव माने, गणेश माने, वामन माने आदी.मान्यवर उपस्थित होते. जि. प. शाळेचे आदर्श शिक्षक वृंद कृतिशील मुख्याध्यापक सुधाकर बनसोडे, बाळासाहेब पाटील, रामचंद्र माळी, सुखदेव वाघ, गणपत जानकर, तुषार पवार, रुक्मिणी कदम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे आयोजन छानसे शाळेत केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे शाळेकडून स्वागत करण्यात आले. शाळेतील विद्यार्थिनी सृष्टी संजय लोंढे आणि विद्यार्थी विघ्नेश सचिन चव्हाण यांची छान आणि लक्षवेधी भाषणे झाली. यानंतर शाळेचे माजी विद्यार्थी जीवन संघर्षकार फेम प्रसिद्ध कवी नवनाथ रणखांबे यांनी उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीबद्दल शुभेच्छा देऊन त्यांच्या महान कार्यावर प्रकाश टाकला " डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेऊन ज्ञान मिळवले तसेच शिक्षण घेऊन ज्ञान मिळवा, मोठे व्हा!" असे उपस्थित मुलांना मार्गदर्शन करून आपले विचार मांडले. भीमगर्जना युवा मंचचे अध्यक्ष रविंद्र माने यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या व आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनाने सांगता करण्यात आली.
ग्रामपंचायत कार्यालय गौरगांव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली. गावच्या कार्य कुशल सरपंच संगीता कोळी यांनी भगवान गौतम बुद्धांच्या आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. दीप प्रज्वलन करून अगरबत्तीच्या सुगंधी वातावरणात यावेळी सामुहिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले. सदरहू कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतच्या सरपंच संगीता कोळी , सदस्या वर्षाराणी खराडे , ग्रामसेवक आर. जे .देशमुख , पवन खराडे, उपस्थित आशा सेविका, भीम गर्जना युवा मंचचे अध्यक्ष रविंद्र माने, प्रसिद्ध कवी ( साहित्यक ) नवनाथ रणखांबे, माजी सरपंच सतीश खराडे, अरुण सुतार, दिलिप माने, साहेबराव माने , राजेश माने, मनमित रणखांबे, आदी उपस्थित होते.
भीम गर्जना युवा मंच गौरगांव आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती बौद्ध विहार गौरगांव येथे अध्यक्ष रविंद्र माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला गावच्या कर्यकुशल सरपंच संगीता कोळी यांनी पुष्पहार अर्पण केला. उपस्थित ग्रामपंचायतच्या कृतिशील सदस्या वर्षाराणी खराडे , ग्रामसेवक आर. जे. देशमुख, पवन खराडे, डॉक्टर तुपे, माजी सरपंच सतीश खराडे, अरुण सुतार, रूपाली खराडे आदी मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. सुगंधी वातावरणात बुद्ध वंदना घेण्यात आली. महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले . भीम गर्जना युवा मंचचे अध्यक्ष रविंद्र माने,कार्यकुशल सरपंच संगीता कोळी ग्रामपंचायतिच्या कृतिशील सदस्या वर्षाराणी खराडे , माजी सरपंच सतीश खराडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने शुभेच्छा देऊन आपले मत व्यक्त केले. यावेळी रविंद्र माने, दिलीप माने, मारुती माने , एकनाथ माने , नवनाथ रणखांबे, साहेबराव माने, वामन माने, राजेश माने , गणेश माने, मनमित रणखांबे आदि . सह समाजातील बंधू आणि भगिनी उपस्थित होत्या. सदर जयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ रणखांबे आणि साहेबराव माने यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार नवनाथ रणखांबे यांनी मानले.
stay connected