धर्माच्या भिंती तोडणारा
सैय्यद हुसेन शाह !
*युन्नूस तांबोळी, अकलूज.*
पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्लात पर्यटकांचा मृत्यू झाला.
अतिरेक्यांनी पर्यटकांना धर्म विचारला सांगितले गेले.मात्र या भ्याड हल्ल्यात मुस्लिमांचा देखील मृत्यू झाला.दहशतवाद्यांना धर्म नसतो .दहशत हाच त्यांचा धर्म असतो.यात घोडेस्वाराचा व्यवसाय करणाऱ्या सैय्यद हुसेन शाह! याचे बलीदान धर्मांधतेच्या विरोधात उभी राहणारी सैय्यद शाह सारखी लढाऊ बाण्याची माणसे असतात.
पहलगाममधील बैसरन येथे दहशतवाद्यांनी जो भ्याड हल्ला केला याचा निषेध झाला पाहिजे. स्थानिक घोडेस्वार पोटासाठी पर्यटकांची वाट पहात असतात, त्यांना पर्यटकांच्या जाती धर्मांशी देणेघेणे नाही.
दहशतवाद्यांनी ज्या पर्यटकांना धर्म विचारला तेव्हा सय्यद हुसेन शाह सारखा जिगरबाज आडवा आला आलेले पर्यटक काश्मीरचे पाहुणे म्हणून सांगितले,यात सैय्यदचा बळी गेला, मात्र माणुसकी सोडली नाही.अशा लढवय्या सैय्यद हुसेन शाह तुझ्या माणूसकीला सलाम. धर्माच्या जातीच्या भिंती तोडणारा तुझा तमाम भारतीयांना अभिमान आहे. भारतमातेचा निर्भिड पुत्राला सलाम.
धर्म आणि नाव विचारून टिपून मारले, तर मग सय्यद हुसैन यांना गोळ्या का घातल्या? सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा सवाल!
जम्मू काश्मीर : पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म आणि नाव विचारून त्यातील हिंदूंना टिपून मारले.
या हल्ल्यात 26 पर्यटक ठार झाले, तर 20 जण जखमी झाले. 2019 मधील पुलवामा हल्ल्यानंतरचा हा मोदींच्या राजवटीतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असून सुरक्षा व्यवस्थेच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या आहेत. देशावरील या गंभीर संकटातही सत्ताधारी संधीसाधू राजकारण करत असल्याचा आरोप सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे.
या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म आणि नाव विचारून गोळ्या घातल्याचे वृत्त देण्यात येत आहे. या दहशतवादी हल्ल्यात सय्यद हुसैन शाह या जम्मू कश्मीरमधील अनंतनाग येथील व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या असे वृत्त देण्यात येत आहे, तर मग दहशतवाद्यांनी या सय्यद हुसैन या मुस्लिम नागरिकाला गोळ्या का घातल्या? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे. धर्माच्या नावावर राजकारण करणे बंद करा, असेही काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. देशावरील दहशतवादी हल्ला हे गंभीर संकट आहे. या संकटाच्या काळात सत्ताधाऱ्यांनी धर्माच्या नावाने राजकारण करू नये, हल्लातील दोषींना शोधून कठोर करावाई करावी, अशा भावनाही सोशल मिडीयावर व्यक्त होत आहे.
दहशतवादी पर्यंटकांवर गोळीबर करत असताना सय्यद शाह पर्यटकांच्या रक्षणासाठी पुढे आले. त्यामुळे संतप्त झालेल्या दहशतवाद्यांनी त्यांनाही गोळ्या घातल्या, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना धर्म, जात, पात माणुसकी नसते. हेच यावरून दिसून येत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी या गंभीर संकटात नेहमीचे धर्माचे राजकारण करू नये. दोषींना शोधून कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
stay connected