किर्तन केसरी ह.भ.प.अक्रूर महाराज साखरे यांच्या अलौकिक शब्द रचनेतून समाजप्रबोधनाचा संदेश!
--------------------------
तीन दशकापासून राज्यभर संत सज्जनांच्या विचारांची पेरणी...
----------------------------
--------------------------
आष्टी (प्रतिनिधी)
गेल्या तीन दशकावून अधिक सातत्याने अध्यात्मिक क्षेत्राची संबंधित राहून विविध संतांची ग्रंथरचना अभ्यासून राज्याच्या कानाकोपऱ्यात संत महंतांचे समता आणि बंधुतांचे विचार यांची पेरणी करत समाज प्रबोधनाचा दिव्य संदेश देणारे कीर्तन केसरी ह.भ.प.अक्रूर महाराज साखरे सर्वसामान्य भाविक भक्तांच्या हृदयात स्थान निर्माण करू शकले आहेत.
आष्टी तालुक्यातील रुईनालकोल या गावात धार्मिक कार्यक्रमासाठी ह.भ.प.अक्रूर महाराज साखरे किर्तन सेवा केल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी त्यांची भेट घेऊन अध्यात्म कार्याविषयी संवाद साधला.यावेळी त्यांनी दिलेली उत्तरे ऐकून उपस्थित स्तब्ध झाले.संत तुकाराम,संत एकनाथ महाराज, संत नामदेव, चोखामेळा,संत सावतामाळी, संत भगवानबाबा,संत वामनभाऊ,संत गोरोबाकाका आदी सह विविध संत सज्जनांच्या अभंग आणि विविध साहित्याची त्यांनी राज्यभर पेरणी केली.समता, बंधुत्व,ऐक्य सर्वधर्मसमभाव आणि माणुसकी ही मूल्य त्यांनी आपल्या किर्तन सेवेतून भाविक भक्तांच्या हृदयावर बिंबवली.
कीर्तनातून समतेचा संदेश गेला पाहिजे ही भूमिका ठेवणारे ह.भ.प.अक्रूर महाराज साखरे आज सर्वसामान्य भावी भक्तांच्या हृदयात स्थान निर्माण करू शकले आहेत लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले कीर्तन केसरी साखरे महाराज स्वच्छ वाणी, स्पष्टता आणि रसाळ भाषेतून कीर्तन सेवा करणारे ते अत्यंत अभ्यासू महाराज म्हणून नावरूपाला आले आहेत.त्यांच्या या कर्तव्य भावनेला आष्टी, पाटोदा, शिरूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा शिक्षण महर्षी भीमराव धोंडे परिवाराच्यावतीने आभार मानून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बाबुशेठ भंडारी, निवृत्तीदादा बोडखे महाराज, अजय धोंडे,अभय धोंडे, उपसभापती नामदेव धोंडे, चेअरमन राजेंद्र धोंडे,ज्ञानदेव धोंडे,प्रा.बाळासाहेब धोंडे, पांडुरंग धोंडे यांच्यासह गोविंद पवार सर,उत्तम बोडखे, दादा महाराज चांगुणे,आदिनाथ गवळी,विनोद ढोबळे,मुस्ताक पानसरे,रघुनाथ शिंदे,हौसराव आजबे,रविंद्र तवले,तुळशीराम आडसरे,अनिकेत चांगुणे आदि उपस्थित होते.
-----------
धोंडे परिवाराच्यावतीने ह.भ.प.साखरे महाराजांचे कौतुक!
------------------------
धार्मिक कार्यक्रमासाठी आष्टी तालुक्यातील रुईनालकोल या गावी येऊन कीर्तन सेवेमधून केलेले चिंतन समाज उपयोगी आणि समता,बंधुत्वाची पेरणी करणारी ठराली आहे.या त्यांच्या कर्तव्य भावनेला मनापासून धन्यवाद देत माजी आमदार भीमराव धोंडे आणि त्यांच्या परिवाराकडून कीर्तन केसरी ह.भ.प.अक्रुर महाराज साखरे यांचे कौतुक करून शुभेच्छा देण्यात आल्या.
------------------
stay connected