*तब्बल वीस वर्षानंतर गेट टुगेदर,सर्व मित्र मत्रिणींनी एक दिवसाची शाळा अनुभवली.*
*संजीवनी खंडागळे यांच्या प्रयत्नाने आदर्श विद्यालय खालापूरी 2004-05 सालच्या बॅचचा गेट टुगेदर संपन्न-डॉ जितीन वंजारे*
बीड प्रतिनिधी:- शाळा आणि शाळेतील मित्र एक अनोखा संगम, त्यातल्या त्यात बाल मित्र दहावीपर्यंत चे बाल मित्र मैत्रीण म्हणजे अस्सल मैत्री, निस्वार्थी मैत्री आणि त्यातून एकमेकांत तयार झालेले प्रेमाचे बंध हे आयुष्यभर जपले जातात. ही प्रेमाची शिदोरी कायम आयुष्यात कामाला येते. मैत्री निस्वार्थी प्रांजळ आणि कपटरहित असली पाहिजे. मैत्री चांगली असली तरी मित्र चांगले भेटेन महत्वाचं आहे. कपट आणि दुश्मनांचे हस्तक मित्र काय कामाचे नसतात.बालमित्र निस्वार्थी असतात त्यांची मैत्री आयुष्यभर त्यामुळेच टिकते काही लोक मात्र व्यावहारिक दृष्टिकोन समोर ठेवतात. काहींना मित्र वापरून सोडून द्यायचे,व्यावहारिक उधारी करायची आणि नाते संपायचे असेही घडते पण बालमित्र याला अपवाद असतात अशीच खालापूरी गावातील आदर्श विद्यालय खालापूरी येथील2004-2005 चे दहावी पास चे विद्यार्थी विद्यार्थीनी ने एकत्र येऊन एक छान असा गेट टुगेदर पार पाडला. ह्याला एकूण 37 विद्यार्थी आले होते. त्यात सर्व बाल मित्रानी आपला परिचय, आपला व्यवसाय नौकरी आणि राहण्याचे ठिकाण सांगून आपल्या भावना व्यक्त केल्या सर्व विद्यार्थ्यांना समोर येऊन बोलण्याची संधी दिली. सर्वजण बोलले व्यक्त झाले भावनांना बिनधास्त व्यक्त होताना बऱ्याच जणांनी त्या काळाच्या झालेल्या चुकांची माफी मागितली, काहींनी अधुरे स्वप्न पुरे केल्याचा आनंद व्यक्त केला,काहींनी आम्हाला भेटल्यावर किमान बोलत तरी जावा असा अट्टाहास केला तर काहींनी मी काय होतो आज काय आहे आणि काय असलो तरी मित्रांशिवाय काहीच नाही. जीवनात चांगले मित्र असणं गरजेचं आहे. शेवटी प्रपंच, व्यवसाय आणि सगळं करूनही आपण मित्र म्हणून भेटल्यावर आपल्यात आपण जे बोलणार आहोत त्यात नक्कीच फरक पडणार नाही. त्याच हक्काच्या शिव्या देऊन बोलणं मग कोणी कलेक्टर,डॉक्टर इंजिनियर, किंवा काहीही पदाधिकारी असो त्याला अगदी आरामात आदरपूर्वक शिव्या देऊन हक्काने बोलणारा मित्र परिवार म्हणजे बालमित्र परिवार. या कार्यक्रमाला उपस्थित सर्वच मित्र मैत्रिणींचे सर्वांनी एकमेकांचे आभार मानले.जीवनाच्या व्यस्ततेत विरंगुळा आणि अस्सल जुन्या आठवणीना उजाळा देण्यासाठी सर्व मित्र मैत्रिणी अगदी आनंदाने सामील झाले होते. सकाळी शाळेत म्हणजेच आदर्श विद्यालय खालापूरी येथे जाऊन एक दिवसाची शाळा अनुभवली ज्या बेंच वर सुरुवातीला बसत होतो तिथे बसण्याचा आनंद घेतला, त्यांनंतर बीड येथे हॉटेल दि कास्टल एक्सकेटिव्ह ला ग्रँड एन्ट्री, सर्वांचा परिचय, आपल्या व्यवसाय, उद्योग किंवा नौकरीची माहिती देऊन मनोगत व्यक्त केले, चहा,नास्ता,शीतपेय, घेऊन दुपारी सोबत स्नेहभोजन केले सर्वांनी एकत्र जेवण केल्यानंतर फोटो शेशन केले, विविध रील तयार करून परत एकदा चहा आईस्क्रीम घेऊन सर्वांनी हॉटेल दि कास्टल एक्सिकेटिव्ह येथून निरोप घेतला. तब्बल वीस वर्षांनी न भेटलेली ही पाखर एकदा एक दिवस सोबत राहून परत आपापल्या सांसारिक गुंतागुंतीत पुन्हा व्यस्त झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनीच मेहनत घेतली विशेष मेहनत घेऊन सर्व विद्यार्थी विध्यार्थी नी यांना एकत्र करणारी संजीवनी खंडागळे हिचे विशेष आभार यावेळी सर्वांनी मांडले. तिच्या विशेष नियोजनात फोटो आणि व्हिडीओ शेषण पार पडले.
stay connected