शौकत अन्वर पठाण यांची मानव विकास परिषदेच्या बीड जिल्हा सचिव पदी निवड
आष्टी प्रतिनिधी -
मानव विकास परिषद म्हणजे शोषित, श्रमिक, पोलिस कोठडीत मृत्यु, बेकायदेशीर अटक, शोषण, गुलामगिरी, दहशत, मागसवर्गीयांवर होणारा अन्याय त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयाकडून होणारी पिळवणूक, मानवी हक्कांचे उलंघन, शासकीय अधिकाराचा गैरवापर, भांडवल शाहीकडुन पैशाच्या व सत्तेच्या जोरावर शासकीय यंत्रणेला स्वार्थासाठी होणारा वापर हे सर्व समुळनाश करण्यासाठी तसेच सर्व सामान्यांचे संविधानिक मानवी हक्कांसाठी मानव विकास परिषद प्रयत्नशिल आहे. सामान्य जनतेला न्याय अधिकार मिळवून देणारा बुलंद हा आवाज असुन शौकत पठाण सारख्या सामाजिक कार्यकर्त्याच्या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .
सामाजिक बांधिलकी, निस्वार्थ वृत्ती आणि प्रामाणिकपणा यामुळे मानव विकास परिषदला जनतेकडुन प्रचंड समर्थन मिळत आहे शौकत पठाण यांची बीड जिल्हा सचिव पदावर दि. १७/०४/२०२५ ते दि. १६/०४/२०२६ या कालावधी करीता नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्यावर आष्टी तालुक्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
stay connected