*मागचा पुलवामा आणि आजचा पहलगाम अतिरेकी हल्ला येथील कमकुवत चौकीदाराच प्रतीक-डॉ जितीन वंजारे*
बीड प्रतिनिधी :- स्वतःला चौकीदार म्हणवणारे देशाचे पंतप्रधान यांनी आणि देशाचे गृहमंत्री कमकुवत असल्याचे प्रतीक आहे. असे हल्ले होतातच कसे पुलवामा मध्य शेकडो सैनिक मारले गेले आणि आणि काळचा हा पर्यटकावर झालेला अतिरेकी हल्ला लक्षात घेऊन नैतिकता म्हणून पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केला आहे.
देशात स्वतः चा डंका वाजवणारे छपण इंच छाती चा बोलबाला करणारे आणि स्वतःला चौकीदार म्हणणारे पंतप्रधान मोदी जी चौकीदार आहेत तर देशात असे दंगे, फसाद,अतीरेकी हल्ले आणि धर्मवाद जातीयवाद का घडतो आहे, मणिपूर अजूनही का जळते आहे. येथील उद्योजक आदिवासीयांच्या जमिनी का लुटत आहे. पूछता है भारत? दंगे, फसाद आणि अतिरेकी हल्ले प्ण स्वतःची छाती बडवण्यासाठी केले जातं आहेत की काय. पाकिस्तान एअर स्ट्राईक फेल गेली पन भारतीय मीडियाने अशी दाखवली की अक्खा पाकिस्थान उडवून लावला त्यात एकही अतिरेकी मारला नाही. फक्त मी कसा मोठा आहे हे दाखवणारे सन्माननीय मोदीजींनी आत्ताच अतिरेकी हल्ला आणि पुलवामा हल्ला त्यांच्या काळात झाल्याचे समोर ठेवून राजीनामा द्यावा. आपल्या देशाचे इतके सैनिक आणि नागरिक मारले जातं आहेत आपले गृहमंत्री अमित शाह गप्प आहेत मोदीजी गप्प आहेत चौकीदार असल्याचा दावा करता मग घरात असले अतिरेकी घुसून मारायलेत तुम्ही झोपले काय? करा ना प्रतिकार? चौकीदारच काय काम असत? देश तुमच्या हातात ह्यासाठी दिला का? असा संतप्त सवाल डॉ जितीनदादा वंजारे यांनी केला. कालच्या जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यात जवळजवळ पॅंचेवीस जण मारले गेले, पुलवामा मध्ये शेकडो सैनिक मारले गेले अशी परिस्थिती इंदिरा गांधी यांच्या काळात झाली असती तर त्यांनी पाकिस्थान अक्खा उडवून लावला असता. त्याला धैर्य म्हणतात. मोदीजी फक्त फेकू नका चौकीदार असाल तर ह्या अतिरेकी हल्ल्याचा आणि पुलवामा हल्ल्याची चौकशी अहवाल देशासमोर मांडा उगाच जवानांचे आणि येथील नागरिकांचे जीव धोक्यात घालू नका. येथील सरकार जर हल्ले पचवून घेत असेल तर त्याला सरकार जबाबदार आहे. नव्हे नव्हे तुम्हीच हल्ले करतात की काय असा संशय निर्माण होत आहे. आणि म्हणून नैतिकता म्ह्णून हल्ल्याचा सखोल तपास करून दोषींना धडा शिकवा नसता राजीनामा द्या असे डॉ जितीनदादा वंजारे यांनी म्हटले आहे.
stay connected