पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून निष्पाप पर्यटकांची हत्या केल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजबांधवांच्या वतीने तीव्र निषेध
हाजी हाफीज फतेह मोहम्मद जोधपूरी मस्जिद राऊतनगर (अकलूज)येथे शुक्रवारच्या नमाजपठणानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून निष्पाप पर्यटकांची हत्या केल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजबांधवांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
यावेळी मस्जिदचे जेष्ठ सल्लागार प्रा.शेरखान पठाण म्हणाले, दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेला हल्ला नसून भारतवासीयांवर केलेला हल्ला आहे.यावेळी देशवासियांनी एकजूट दाखवून दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावावेत.
यावेळी मस्जिदचे मौलाना वाहिद साहेब म्हणाले की, दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्लायाचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.या भ्याड हल्ल्याची किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल.
यावेळी मुस्लिम समाजातील २००ते२५०बांधव उपस्थित होते.
यावेळी मस्जिदचे माजी अध्यक्ष दस्तगीर शेख, अस्लम मिरासाहेब सय्यद, सलीम खान पठाण, इब्राहिम बागवान (सर),आसिफ शेख,शागीर सय्यद ,अकबर शेख,अमीर मुजावर,जेहुर सय्यद,याकुब शेख,आदि बांधव उपस्थित होते.
stay connected