हिंदूद्रोह्यांनो… एक हिंदू म्हणून सांगतो… तुमच्यावर आता आम्हा हिंदूंचा विश्वास नाही ! - अभिनेता किरण माने

हिंदूद्रोह्यांनो… एक हिंदू म्हणून सांगतो… तुमच्यावर आता आम्हा हिंदूंचा विश्वास नाही ! - अभिनेता किरण माने



...जेव्हा आम्हा हिंदूंचे आराध्य राजे छत्रपती शिवरायांना अर्वाच्य शिवीगाळ करणार्‍या आणि राजमाता जिजाऊ मासाहेबांचं चारित्र्यहनन करणार्‍या कोरटकरला विशेष सुरक्षा पुरवली, तेव्हा तोंडातून ब्र सुद्धा न काढणार्‍या बांडगुळांना आज आमच्या हिंदू धर्माचा पुळका आलाय.


...छत्रपतींच्या पुतळ्यात भ्रष्टाचार झाल्यामुळे तो कोसळला. त्यावेळी पुतळा बनवणार्‍या, बसवणार्‍या, उद्घाटन करणार्‍या, कुणाकुणाचाही निषेध न करणारे भिकारडे आज आम्हाला हिंदुत्व शिकवताहेत.


...शांततेत आंदोलन करणार्‍या आम्हा हिंदू माताभगिनींवर अंतरवाली सराटीमध्ये अमानुष लाठीचार्ज झाला, त्यावेळी मुग गिळून गप्प बसलेले शातीर लोक आज आम्हाला हिंदुत्व शिकवताहेत.



...रोज आत्महत्या करणारा आमचा हिंदू शेतकरी राजा स्वत:च्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याची हेटाळणी करणारे पीट मागे आज आम्हाला हिंदूत्व शिकवताहेत.


अरे बांडगुळांनो, तुमच्यावर आता हिंदू बहुजनांचा विश्वासच नाही. उलट तुम्ही ज्याअर्थी एवढा धिंगाणा घालताय त्याअर्थी 'दाल में कुछ काला है'. आम्हा हिंदूंचे खरे शत्रू आम्ही ओळखलेले आहेत.


तुम्ही लाख मुस्लीमद्वेष पसरवाल, पण लोक आता हुशार झालेत. या देशावर प्रेम असलेले देशातले सगळे मुस्लिम आम्हाला भावासारखे आहेत... कारण वरच्या सगळ्या प्रसंगांमध्ये जेव्हा तुम्ही शेपूट घातले होते तेव्हा हे मुस्लिम बांधव आम्हा हिंदुंच्या पाठीशी सक्रियपणे उभे होते.



आम्हा हिंदूंवर झालेल्या पहलगाम हल्ल्याचा निषेधच आहे. पण तो नक्की कुणी केलाय? हे समोर येईपर्यन्त आम्ही विश्वास ठेवणार नाही. ते समोर आल्यावर त्यामागचे सूत्रधार कोण होते? त्यांना मिल्ट्री आणि बीएसएफची सुरक्षा भेदून आत यायला कुणी मदत केली? हे सगळे कळाल्याशिवाय आम्ही उगाचंच उठसूट कुठल्याही धर्माला दोष देणार नाही. हा शोध घेणार्‍या सरकारी यंत्रणेसोबत आम्ही हिंदू बहुजन आणि सर्वधर्मीय देशबांधव भक्कमपणे एकजुटीनं उभे आहोत. त्यांनी लवकरात लवकर शोध घ्यावा. 



एका बाईच्या नादी लागून कुरुलकर नांवाच्या देशद्रोह्यानं आपल्या सुरक्षाव्यवस्थेतली गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवली त्यावेळी त्याला पाठीशी घालणाऱ्या वृत्तीसारखी प्रवृत्ती या हल्ल्याची मास्टरमाईंड असणार ! त्या अतिरेक्यांना शस्त्रास्त्रं आणि पोलीस गणवेश पुरवून, सगळा प्लॅन रचून, "तुम्ही हिंदू आहात का मुसलमान? हे विचारून माणसे मारा म्हणजे भारत देशात मुस्लीमद्वेष पसरून दुही माजेल आणि आमचा फायदा होईल." अशी सुपारी देणारा दगाबाज कोण आहे, त्याला काय फायदा झालाय, हे सिद्ध झालेच पाहीजे. मुस्लीमद्वेष पसरण्याचा फायदा नक्की कोण घेतं? पाकीस्तान की चीन की श्रीलंका? की घरचेच भेदी? हे न्यायसंस्थेत तपासणी होऊन समोर आले पाहिजे. मग त्या दगाबाजाचा बदला कसा घ्यायचा ते संविधान, पोलीस दल आणि भारतीय लष्कर ठरवेल.


...पण पुलवामा हल्ल्याचा अजूनही शोध लागलेला नाही, हे सगळ्या भारतीयांच्या लक्षात आहे.


भारतीय संविधान मानणारे वरवरच्या अंदाजांवर विश्वास ठेऊन धर्मद्वेष करत नाहीत. पुरावे दाखवा, सिद्ध करा मग ठरवू. 


जय शिवराय... जय भीम.


- किरण माने.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.