भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ धानोरा येथे रविवारी कॅन्डल मार्च
पहलगाम येथील आतंकवाद्यांनी केलेल्या 27 भारतीयांच्या हत्येच्या निषेधार्थ धानोरा (ता. आष्टी ) येथील हिंदू -मुस्लिम -बौद्ध बांधवांसह सर्व ग्रामस्थ उद्या रविवार दि . 27 रोजी सायंकाळी 7 वाजता गावातून कॅन्डल मार्च काढून निषेध व्यक्त करणार असुन 27 भारतीयांना श्रध्दांजली अर्पण केली जाणार आहे .धानोरा ग्रामस्थांनी या सर्वधर्मीय निषेध रॅलीत व श्रध्दांजली सभेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे .
काश्मीर येथील पहेलगाम येथे जो भ्याड दहशतवादी हल्ला झालेला आहे त्याचा निषेध सर्वत्र होत असुन हा समस्त मानवतेवर झालेला भ्याड हल्ला आहे . या अमानवीय घटनेतील हल्लेखोरांना तात्काळ पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी . समस्त धानोरा ग्रामस्थ हिंदू मुस्लिम बौद्ध व सर्वधर्मीय बांधवांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे . या हल्ल्याची सखोल चौकशी करून हल्ले करणाऱ्या सैतानांवर कारवाई करावी तसेच कठोर शिक्षा देण्यात यावी . अशी मागणी धानोरा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे . या कॅन्डल मार्चमध्ये सर्व जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन धानोरा ग्रामपंचायत तसेच पंचायत समिती सदस्य परमेश्वर काका शेळके यांनी केले आहे .
stay connected