समाजसेवक सुरेश पाटील यांच्या हस्ते बांधकामाचे भूमिपूजन
------------------
-------------------
आष्टी (प्रतिनिधी)
तालुक्यातील वटनवाडी येथील गरीब कष्टकरी, अल्पभूधारक शेतकरी भीमराव पोकळे यांच्या नवीन घराच्या वास्तूचे भूमिपूजन शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा समाजसेवक सुरेश पाटील यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
प्रत्येक व्यक्तीला आपले स्वतःचे सुंदर घर असावे असे वाटते. परंतु आर्थिक अडचणीचा सामना करत नैसर्गिक आपत्ती सह कृत्रिम आपत्तीला तोंड देत आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र कष्ट करुन पै-पै जमा करुन स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. असेच आष्टी तालुक्यातील वटणवाडी येथील गरीब कष्टकरी अल्पभूधारक शेतकरी भीमराव पोकळे यांचे अनेक दिवसापासूनचे घराचे स्वप्न आज प्रत्यक्षात साकार होत आहे. नवीन घराच्या बांधकामाचे भूमिपूजन सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिव्हिल इंजिनियर चंद्रकांत धस, घराचे मालक भिमराव पोकळे, बांधकाम करणारे कामगारा सह गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.
stay connected