जम्मू काश्मीर येथून जातीयवादी,धर्मवादी भडव्यांचे होश ठिकाणावर आणणारी हिरकणी म्हणजे पूजा मोरे-जाधव होय-डॉ जितीन वंजारे

 *चळवळ रक्तात असली की वेळ,काळ आणि ठिकाण महत्वाचं नसतं, महत्वाचा असतो तो असत्याविरुद्ध उठाव-डॉ जितीन वंजारे*




*जम्मू काश्मीर येथून जातीयवादी,धर्मवादी भडव्यांचे होश ठिकाणावर आणणारी हिरकणी म्हणजे पूजा मोरे-जाधव होय-डॉ जितीन वंजारे*

           मित्रानो चळवळ रक्तात असली की माणूस कश्याचीच तमा-काळजी करत नाही, आम्ही रस्त्यावरील लढाईचे बादशाह आहोत, सत्य आणि सत्यासाठी सत्याग्रह कारणे हेच आम्हाला ठाऊक, अन्यायला प्रतिकार करून दोनाचे चार आणि चाराचे सोळा हात अन्याया विरुद्ध लढण्यासाठी उभा करणे म्हणजेच क्रांतीची मशाल पेटवणे हेच आमच्या रक्तात असतें असच जणू काही ठणकावून सांगणारी क्रांतिकारी रणरागिणी म्हणजे पूजा मोरे होय. नुकताच पूजा मोरे आणि धनंजय जाधव यांचा विवाह सोहळा पुणे येथे पार पडला हळदही फिटली नाही,हनिमून साठी जम्मू काश्मीर येथे गेले असता फलगाम येथे अचानक अतिरेकी हल्ला झाला आणि श्रीनगर येथे असणार हे युगल खडबडून जाग झालं, आपल्या चैन एशो आराम वेळेचा सदुपयोग करायचं बाजूला ठेऊन ह्या युगलाने क्रांतीचा मार्ग पकडला, स्थानिकांच्या चालू केलेल्या आंदोलनात त्या पतीसह सामील झाल्या. घोषणाबाजी आणि मोर्चाला हिंदीतून दिलेलं संबोधन पाहण्याजोग होत, ही रणरागिणी तेथून जातीयवाद, धर्मवाद आणि हिंदू-मुस्लिम करू पाहणाऱ्या आणि देशातील वातावरण बिघडू पाहणाऱ्या गोबर भक्तांना आर्त किंकाळ्या मारून जाग करत होती की बाबांनो इथे हिंदू मुस्लिम लढाई नाही येथे भाईचारा आहे येथील मुस्लिम आमची काळजी घेत आहेत आम्हाला जेवण, राहणं खान आणि निवाऱ्याची सोय करून भाईचारा अबाधित ठेवत आहेत.आम्हाला टॅक्सी मोफत देत आहेत, पैसे नसले तर ते पन देत आहेत.जरी अतिरेक्यानी बंधूकीच्या धाकाने हिंदूच मारले असतील तरी येथील घोडेवाले, व्यावसायिक, आणि मूलनिवासी आम्हाला साथ देत आहेत,गद्दार मुस्लिम अतिरेकी असतील पन येथील मुस्लिम आमचे भाई बंधू आहेत त्यामुळे देशात हिंदू मुस्लिम वातावरण तयार करू नका असा सल्ला ह्याच भगिनीने सर्वात पहिल्यांदा तेथून दिला. ती आज अखंड भारतात व्हायरल झाली आहे आणि काही जातीयवादी धर्मवादी बांडगुळ तिला ट्रोल करत आहेत अरे स्वतःची लायकी बघा, आपण दुसऱ्याच्या किती कामाला येतो हे बघा, आपल्याला काय करता येत नसेल तर किमान दुसऱ्याला तरी वाईट बोलू नये. पूजाताई मोरे अन मी 2016-17 साली बालाघाट वर एका शिवजयंती कार्यक्रमात भेटलो होतो, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती त ह्या भगिणीने स्वतःच वैभव निर्माण केल आहे. एक सामाजिक आणि राजकीय ओळख निर्माण केली आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अतिशय आक्रमक असणारी पूजा मोरे आज भारतात हिंदू मुस्लिम भाईचारा प्रस्थापित करण्यात यशस्वी झाली आहे. ह्या अतिरेकी हल्यामागून अनेक छोटे मोठे कारस्थान चालू झाले आहेत, पाकिस्थानी भारतातून नक्कीच हाकलून दिले पाहिजेत पन येथील भारतीय मुस्लिमांना त्रास होता कामा नये. क्योकी इस धरती के आझादी के लीये उनका भी खून शामिल है.....! स्वातंत्र्य ता संग्रामात शेकडो पठाण शेख धारातीर्थी पडले आहेत समोरून छातीवर त्यांनी गोळ्या खाल्या आहेत आणि म्हणून त्यांना काही उद्रेकआंती त्रास होऊ नये. हीच येथील मनावतावादी, समतावादी आणि शिव शाहू फुले आंबेडकरी विचारांच्या तमाम लोकांच्या भावना आहेत. पूजा मोरे यांनी हेच काम तिथे राहून केल, ज्यांना ज्यांना हल्यात मार लागला, दुखापत झाली कोणाचा मोबाईल पर्स हरवली त्यांना स्वतःच्या मोबाईल वरून त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून दिला, त्यांची सेवा सुश्रुता यावेळी त्यांनी आर्मी कॅम्प मध्ये जाऊन केली, अमन शांती यात्रेत सहभाग घेतला, आणि मोर्चाच लीड केल, मोर्चात संबोधन करतानाचा भाईचारा, अमन शांती चा नारा अक्खा देशभर पोहचवाला. तेथील सत्य परिस्थिती जगासमोर मांडली ह्या जोडप्यान जे केल ते मानवतेला साजेसं होत. आणि म्हणूनमी मा. सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर तिचा भाऊ म्हणून अख्या महाराष्ट्राला सांगतोय की मराठा आरक्षणात पूजा मोरे चांगली वाटली, महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी यांच्या प्रश्नावर आवाज उठवताना जेल मध्ये जाताना चांगली वाटली, गोरगरिबांची पोट तिडकीने काम करताना चांगली वाटली मग हिंदू मुस्लिम भाईचारा मानवता जपताना जम्मू येथून हनिमून बाजूला ठेऊन मोर्चात उतरून सगल्याना मदत करताना तुम्हाला ती का चांगली वाटू नये? म्हणजे आपल्यासाठी केल तर खूप चांगलं आणि इतर धर्मासाठी खऱ्यासाठी केल तर ती वाईट अरे मूर्खांनो कोण तुम्ही हे ठरवणारे धर्माचे ठेकेदार? पूजाताई मोरे-जाधव सारख्या रणरागिणी साठी मा.सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर सारखा भाऊ खंबीर मागे उभा आहे. ट्रोल करणार्यांची जातं अन धर्म एकदा तपासा स्वतः किती मलिनी आहात बघा आणि मग या समोरासमोर चर्चेला. अहो मराठा क्रांती मोर्चात ह्याच भगिनीला ओबीसी विरुद्ध बोलायला लावणारे भडवे आज तिला हिंदू असूनही काश्मीर मध्ये जाऊन भारत माता की जय बोलणारी खरी हिंदू शेरणी यांना ट्रोल करावीशी वाटत आहे. मनुवादी भडवे किती खालच्या थराला जाल,म्हणजे हे धर्माचे ठेकेदार पुरोगामी विचाराच्या शाहू फुले आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्यांना हिंदुत्व शिकवणार का? म्हणजे मराठा साठी लढली तर वाघीण सर्वधर्म समभाव साठी लढली तर वाईट असं कस चालेल भाऊ. हे असं झालं हिंदू आहेत म्हणून ओबीसी, एस सी एस टी लोक खालच्या जातींचे वाटतात आणि मुस्लिम सोबत लढण्यासाठी ते हिंदू गणले जातात ही प्रथा बंद करा. संघी डोकं वापरून ह्या वाघिणीला ट्रोल करू नका.आणि हे उघड आहे एका गेवराई पासून प्रवास चालू केलेली  गरीबाची मुलगी आज जम्मू-कश्मीर मध्ये मोर्चा सांभाळते आहे.... कस खपणार आहे येथील मनुवादी कुत्र्यांना. नक्कीच नाही आणि म्हणून ट्रोल करणाऱ्यांसाठी स्वतःच्या आई बहिणीवर ही असेच आरोप प्रत्यारोप करावेत. ह्या महाराष्ट्राच्या रणरागिणीला एक ही वाईट शब्द बोलण्याची तुमची लायकी नाही इतकंच..... 

*तुझाच भाऊ मा. सम्राट डॉ.जितीनदादा वंजारे खालापूरीकर*




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.