*नवनगर शिक्षण मंडळाचे,सरस्वती माध्यमिक विद्यालय,आकुर्डी ,पुणे ३५,शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल.*
*निगडी*:- आज,शुक्रवार दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी २०२४-२५ मधील इयत्ता ५ वी व ८ वी या वर्गांच्या शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर झाला.इयत्ता ५ वी चे २७ विद्यार्थी बसलेले होते त्यात ७ विद्यार्थी पात्र झालेत.त्यातील ३ विद्यार्थ्यांना २०० चे पुढे गुण मिळाले.१) कु.झीनत मुलानी:- २१० गुण,२) चि.ऋषिकेश घोलप:- २०८ गुण,३) कु.ललिता चौधरी:-२०४ गुण.या विद्यार्थ्यांना मराठीचे अध्यापन सौ.कल्पना उभे मॅडम,गणिताचे अध्यापन सौ.सविता पाटील मॅडम व सौ.रेश्मा बनसोडे मॅडम,इंग्रजीचे अध्यापन सौ.प्रतिमा काळे मॅडम,बुद्धिमत्ता चे अध्यापन श्री.काळूराम पवार सर व श्री.राहुल वांगेकर सर यांनी केले.यातील १)चि.ऋषिकेश घोलप व २) कु. झीनत मुलानी या दोन विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात ५० पैकी ५० तर कु.श्रेया साठे या विद्यार्थिनीला ५० पैकी ४६ गुण मिळाले. इयत्ता ५ वी चा शिष्यवृत्तीचा २५.९३% निकाल लागला.
इयत्ता ८ वी चे ३९ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसले होते त्यातील १२ विद्यार्थी पात्र आहेत.तर १)कु.वैभवी शिंदे:-२४४ गुण,२) चि.आदित्य शेळवने:-२१४ गुण,३)चि.ललित कुंभार:-२०२ गुण प्राप्त झाले.यांना मराठीचे अध्यापन :-श्री.अविनाश शिरसाट सर,गणिताचे अध्यापन सौ.बेंडाळे मॅडम व श्री.सोनवणे सर,इंग्रजीचे अध्यापन :-सौ.स्वाती बच्छाव मॅडम,बुद्धिमत्ता चे अध्यापन श्री. जगदीश चव्हाण सर यांनी केले.इयत्ता ८ वी शिष्यवृत्तीचा ३०.७६% निकाल लागला.
या सर्व विद्यार्थ्यांना माननीय व्यवस्थापक- श्री.गोविंदजी दाभाडे सर,प्राचार्या- सौ.संगीता गुरव मॅडम,उपप्राचार्य- श्री.विजय बच्चे सर ,पर्यवेक्षक- श्री.संजय कांबळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माननीय मोठे सर प्राचार्या ,उपप्राचार्य, पर्यवेक्षक,शाळेतील सर्व शिक्षक,इतर कर्मचारी वर्ग व पालकांनी हार्दिक- हार्दिक अभिनंदन केले.
stay connected