श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड ते मुंबई एसटी बस सेवा आज पासून सुरू
( आष्टी प्रतिनिधी / राजु गायकवाड ) - श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड ते मुंबई ही एसटी बस सेवा भाविकांच्या सोईसाठी सुरू करण्यात आली असून त्यास प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे . ही बस सेवा परेल पासून श्री क्षेत्र गहिनीनाथ गड पर्यंत ये - जा करणार आहे . तीचा मार्ग हा परेल ,दादर , कुर्ला , मैत्री पार्क , मानखुर्द , वाशी , नेरूळ , बेलापूर , खारघर ,कामोठे , कळंबोली ,पनवेल , वल्लभ नगर , शिवाजीनगर पुणे , येरवडा , खराडी बायपास , वाघोली , शिक्रापूर , रांजणगाव , शिरूर ,सुपा , केडगाव , अहिल्यानगर माळीवाडा , दौलावडगाव , कारखेल , मसोबाची वाडी फाटा , पिंपरी घाटा , धामणगाव , खिळद , लिंबोडी फाटा , पाटण सांगवी , सांगवी फाटा , डोईठाण , हातोला फाटा , गहीनाथ गड चिंचोली अशी बस सेवा सुरू करण्यात आली आहे .
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड ते मुंबई एसटी बस सेवा ही सोमवार दिनांक 21 एप्रिल 2025 पासून सुरू करण्यात आली आहे . मुंबई दादर येथून ही बस सकाळी सहा वाजता गहिनीनाथ गडासाठी मार्गस्थ होईल . गहिनीनाथ गडावर ही बस 03:00pm वाजता पोहोचेल गाडी मुक्कामास न थांबता
दुपारी त्याच दिवशी 03:30 वाजता गहिनीनाथ गडावरून मुंबई साठी रवाना होईल . या बसचे स्वागत मसोबा वाडी फाटा येथे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले . याप्रसंगी चालक व वाहकाचा सत्कार करण्यात आला .
stay connected