*भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्या मागणीला यश रिक्त पोलीस पाटील भरतीचे जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश*
बीड दि.20(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील ११२२ पोलीस पाटील रिक्त पदांची भरती त्वरित करावी अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री बावनकुळे यांचेकडे केली होती या मागणीची दखल घेऊन मा जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी उपविभागीय अधिकारी यांना भरती बाबत आदेश दिले आहेत.
बीड जिल्ह्यात कोरोना काळापासून आजपर्यंत जवळपास 85 टक्के गावांमध्ये पोलीस पाटील हे पद रिक्त होते. पोलीस पाटील हे पद ग्रामीण भागातील जनता व प्रशासनाच्या मधील महत्वाचा दुवा आहे. जेणे करुन प्रशासनास गावातील घडामोडी या त्वरीत कळतात व त्यामुळे प्रशासनास शासन चालवणे सोयिस्कर होते. व ग्रामीण भागातील गुन्हेगारीलाही त्यामुळे आळा बसतो. सद्यास्थितीत आज बीड जिल्हयामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. पोलीस प्रशासनही सद्य परिस्थीतीमध्ये ग्रामीण भागापर्यंत पोहचू शकत नाही. आज मितीला बीड जिल्हयात जवळ जवळ 1322 पैकी 1122 रिक्त पदे असून 200 पोलिस पाटील कार्यरत आहेत. पोलिस पाटलांची रिक्त पदभरती झील्यास बीड जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगारांना नौकरी मिळून रोजगार मिळेल. बीड जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था पाहता पोलिस पाटलांची रिक्त पदे भरणे अत्यंत आवश्यक होते. याबाबत त्वरित भरती करण्यात यावी अशी मागणी होत बीड जिल्हा भाजप अध्यक्ष शंकर देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. देशमुख यांच्या या निवेदनाची महसूल मंत्री यांनी देखील त्वरित दखल घेऊन जिल्हाधिकारी बीड यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील माजलगाव,बीड,पाटोदा,अंबाजोगाई,परळी वै.उपविभागीय अधिकारी यांना भरती बाबतचे निर्देश देऊन भरतीचे वेळापत्रक दिले आहे दि.२ मे पासुन अर्ज स्वीकारण्या सुरवात करण्यात येणार आहे दि. १९ मे पर्यंत अर्ज स्वीकारले जातील व दि.२० जूनला लेखी परिक्षा होईल व दि.४ जुलै रोजी तोंडी मुलाखती होऊन नियुक्ती मिळतील अनेक वर्षापासून पोलीस पाटील भरतीचा रखडलेला प्रश्न अखेर जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांचेमुळे मार्गी लागला
stay connected