एस.एम.देशमुख सोमवारी शेगाव दौऱ्यावर

 *एस.एम.देशमुख सोमवारी शेगाव दौऱ्यावर* 




मुंबई : महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांचे नेते आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.श्री.एस.एम.

देशमुख सर  हे दिनांक 21 एप्रिल रोजी शेगाव येथे जात आहेत.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचं अधिवेशन शेगाव येथे होत आहे. त्या संदर्भात स्थानिक पदाधिका-यांशी श्री.देशमुख सर चर्चा करतील. त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी आकाशवाणीच्या वार्ताहर शोभना देशमुख, परिषदेचे सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे आणि डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे हे असतील.

दरम्यान मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांनी आज शेगाव येथे जाऊन   पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन श्री.देशमुख सर  यांच्या दौऱ्याचे नियोजन केले. श्री. चंद्रकांत बर्दे यांच्या समवेत पत्रकार परिषदेचे जिल्हा सरचिटणीस कासिम शेख, संरक्षण समितीचे अध्यक्ष राजेश डिडोळकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख, कुणाल देशपांडे, डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिल उंबरकर व शेगावचे पदाधिकारी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.