*खालापूरी येथे 144 व्या वर्षीचा अखंड हरीनाम सप्ताह संपन्न, भक्तीदास महाराज ह्यांच्या अमृत वाणीने तृप्त झालो-डॉ.जितीन वंजारे*
बीड प्रतिनिधी:- मौजे खालापूरी ता शिरूर कासार जिल्हा बीड येथे गेल्या सात दिवसापासून चालू असलेला अखंड हरिणाम सप्ताह हा फक्त दहा पाच वर्षांपासून चालू नसून हा सप्ताह अनादी काळापासून चालू आहे. नारायण गड येथे नारायण बाबा, महादेव बाबा आणि अनेक महंत मठाधीपती नारायण गडावर येऊन गेले त्यांच्या नियोजनाने खालापूरी येथील अखंड हरीनाम सप्ताहची सुरुवात आणि चाल चलन चालू झालं. नारायण गड म्हणजे धाकटी पंढरी होय, हे नगद देवस्थान असून इथे बोललेलं खरं होत, ह्या देवाची शपथ घेऊन जर कोणी मोडली तर त्याच वाईट होत त्याला अध्यात्मिक आणि प्रारब्धीक भोग पाहवयास मिळतो,येथे प्रभू राम वनवासाला वापस फिरल्यानंतर त्यांचं पुष्पक विमान इथेच ह्याच नगरीत थांबवलं होत त्याच कारण असं होत की नारायण गड ज्या डोंगरावर आहे तो डोंगर चंद्राकार अर्ध गोल असून त्याच्या खाली शिळानी बांधलेलं एक बोगदा आहे आणि आत एक तलाव असून त्यात पाणी आहे त्या तलावात तेरा महा ऋषींनी तप केलेलं असून त्या तपाच्या फलस्वरूप प्रभू श्रीरामाच पुष्पक विमानात आवाज होऊन ते बंद पडलं आणि इथे उतरून त्या तेरा ऋषींना पावन होऊन सिद्ध केल अशी अख्यायका आहे. म्हणजे रामायनात ही उल्लेख असणाऱ्या नारायण गड नगरितील त्या काळाच्या मोठी बाजारपेठ असणाऱ्या खालापूरी येथील हनुमान मंदिर हे पावन देवस्थान आहे.त्या पावन नागरितील हनुमान मंदिरा पैकी एक महत्वाचं हनुमान मंदिर म्हणजे खालापूरी येथील हनुमान मंदिर होय ह्याच ग्रामदैवताचा हा अखंड हरीनाम सप्ताह आज संपन्न झाला. या अखंड हरीनाम सप्ताहला नारायणगड पंचक्रोशीतील व खालापूरी पंच गनातील जवळजवळ सर्वच गावातून भरपूर लोक येतात. गावातील सर्वच बाहेर आलेले डॉक्टर,इंजिनियर, वकील, प्राध्यापक, शिक्षक,नौकरदारवर्ग ,कामगार, शेतकरी, प्राध्यापक,जवान आणि सर्वच स्थरातील मान्यवर सप्ताह समारोह समाप्ती निमित्त गावात येतात मनोभावे देवाची सेवा करतात आणि आपापल्या सेवागावी निघून जातात. विशेष म्हणजे गावातील भगिनी ज्या बाहेरगावी सासरी नांदायला गेल्या आहेत त्या ह्या अखंड हरीनाम सप्ताह साठी माहेरी येतात.चार दोन दिवस सुखाचे जगतात आणि परत सासरी जातात.नवीन मंदिर बांधल्यानंतर त्यांच्या कडून निधी जमा करून मंदिरावर कळस लावण्यात आला होता.असा हा सप्ताह अतिशय भक्तिमय, आनंदात आणि हर्ष उल्हासात गेल्या सात दिवसापासून साजरा होत आहे. भक्तीदास महाराजांनी जगतगुरू भगवान संत श्रेष्ठ तुकोबा महाराजांचे भाऊ कन्होबा महाराज यांच्या हिंदी वांगमयातील चार चरणाची गवळण रुपी अभंग कीर्तन सेवेसाठी घेतला तो म्हणजे "चुरा चुरा कर माखन खाया,गवलन का नंद कुमर कन्हैया! करे बराई दिखावत मोही जाणत हू प्रभुपण तेरा सब ही!! और मात सून उखलसू गला,बांधलीय आपना गोपाला! फिरत बनबन गाऊ धरावत कहे तुकया बंधू लकीर लेले हात!!" हा सुंदर अभंग रुपी गवळण सुंदर वर्णन करून सांगितला पेंद्या आणि कृष्ण यांच्या माखन चोरीचा प्रसंग सांगितलं. त्यांच्या अमृत वाणीने तृप्त झाल्याचे डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी म्हटले.आज दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी त्याची सांगता झाली आहे.सप्ताह निमित्त गावातील व गावाबाहेरील अनेक नेते सामाजिक कार्यकरते, विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी सप्ताह सांगतेला सामाजिक कार्यकर्ते डॉ जीतीनदादा वंजारे खालापूरीकर ,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शाम धांडे, शिवसेना नेते नितीन भैया धांडे, माजी सभापती नारायण परजने, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष ओबीसी डॉ जयश्री मुंढे,सरपंच गणेश घोलप,माजी सरपंच किरण परजने,उपसरपंच माऊली परजने, इंजि. पंढरी परजने,हभप उद्धव नाना काळे, सानप मामा,कृष्णा परजने,अशोक लोकरे, पत्रकार जगन्नाथ परजने, पत्रकार अशोक गवळी, वस्ताद दिगंबर गवळी,पप्पू खरपाडे, सोमनाथ भसमारे,बाळू उगले,पोलीस उमेश उगले, बाबासाहेब लोंढे, मुरलीभाऊ उगले, बप्पा परजने, सचिन परजने, गणेश उगले, प्रल्हाद परजने, विनायक परजने,विनायक गवळी,सुरेश परजने, यासह परजने, उगले, सानप, मुंढे, गवळी, वंजारे, फावडे, रकटे, लोंढे, पठाण, शेख, जोगदंड, खरपाडे, भसमारे,गुंड,इत्यादीसह अनेक ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते.
stay connected