कौशल्य विकास आणि मनोरंजक खेळ" या बाळासाहेब शेंदूरकर यांच्या सातव्या पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली येथे संपन्न

 कौशल्य विकास आणि मनोरंजक खेळ" या बाळासाहेब शेंदूरकर यांच्या सातव्या पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली येथे संपन्न





"कौशल्य विकास आणि मनोरंजक खेळ" या बाळासाहेब शेंदूरकर यांच्या सातव्या पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली येथे संपन्न झाले .



९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे विधान परिषदेच्या उपसभापती श्रीमती नीलम ताई गोरे यांच्या शुभहस्ते व साहित्य संमेलनाचे आयोजक श्री संजय नहार, बालभारतीचे किशोरचे संपादक श्री किरण केंद्रे ,श्रीमती संगीता ताई बर्वे,श्री तोशरे साहेब, ॲड जयप्रकाश सोमानी सुप्रीम कोर्ट दिल्ली प्रकाश श्री घनश्याम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत "कौशल्य विकास आणि मनोरंजक खेळ" हे बाळासाहेब शेंदूरकर यांचे सातवे पुस्तक,देशाची राजधानी दिल्ली येथे प्रकाशित करण्यात आले . सरहद संस्था, तालकटोरा स्टेडियम दिल्ली येथे हा प्रकाशन सोहळा पार पडला . यावेळी शेंदूरकर सर यांनी

स्वागताध्यक्ष  शरदचंद्रजी पवार  साहेब यांचीही ,६ जनपथ येथील त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी  जाऊन भेट घेतली त्यांनी   महाराष्ट्रातून आलेल्या लेखक व सर्व साहित्यिकांना  सविस्तर मार्गदर्शन केले . 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.