*गांधी महाविद्यालयामध्ये पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन संपन्न*
कडा येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे, शांताबाई कांतीलाल गांधी कला अमोलक विज्ञान व पनालाल हिरालाल गांधी वाणिज्य महाविद्यालय, कडा ता. आष्टी जि. बीड येथे दि. 21. 02. 2025 रोजी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र व भूगोल विभागाने *"पर्यावरण संरक्षण आणि मानवी कल्याणासाठी शास्वत कृषी विकास"* या विषयावर एक दिवसीय बहुविषयक राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. सदरील परीषदेचे उद्घाटन *पद्मश्री राहीबाई पोपेरे (बीजमाता),* यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या *अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. कांतीलाल चाणोदिया* होते तर सदरील परिषदेसाठी प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून *प्रोफेसर डॉ. डी. एस. मुकादम व प्रोफेसर डॉ. अशोक एम. चव्हाण*, वनस्पतीशास्त्र विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर हे उपस्थित होते.
या परिषदेसाठी संस्थेचे अध्यक्ष श्री योगेश भंडारी, सचिव श्री हेमंत पोखरणा, संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ. उमेश गांधी, संस्थेचे विश्वस्त उपाध्यक्ष श्री बाबुलाल भंडारी, संचालक श्री संतोष गांधी व श्री संतोष शिंगवी तसेच आनंदराव धोंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास विधाते व आष्टी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान निंबोरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ. राहीबाई म्हणाल्या अधिक उत्पादनासाठी शेतीमध्ये हायब्रीड बियाणे वापरतात हे बियाणे प्रत्येक वर्षी नवीन विकत घ्यावे लागते. पण आपले गावरान बियाणे वर्षानुवर्ष वापरले तरी आपल्याला कोणतेच आजार होत नाहीत. पण हायब्रीड बियाणे मुळे मानवावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच अति उत्पादनासाठी जमिनीमध्ये रासायनिक खताचा भरमसाठ वापर केल्याने जमिनीचा पोत खालावला आहे व जमीन नापीक होत आहे. आपले जीवन परिचय देताना त्या म्हणाल्या की माझे तीन बाळंतपण छपरामध्ये झालेले आहे व सासू-सासऱ्यांचा त्रास देखील मला होत होता पण मी त्यांचा विचार न करता गावरान बियाणे जपणूक करून व सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून बीज बँक तयार केले. यामध्ये तृणधान्य बियाणे, फळभाज्या व रानभाज्या यांचे बियाणे साठवले जाते. यावेळी प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री हेमंत पोखरणा यांनी केले व परिषदेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जवाहरलाल भंडारी यांनी महाविद्यालयातील उपक्रम संदर्भात प्रास्ताविक पर मार्गदर्शन केले. तसेच यावेळी राष्ट्रीय चर्चासत्राचे सचिव प्राध्यापक डॉ. पाताळे एस. एस. यांचे प्रास्ताविक झाले. यावेळी बोलताना प्राध्यापक पाताळे यांनी वनस्पती शास्त्रातील ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, पेटंट व रिसर्च सेंटर तसेच बोटॅनिकल गार्डन याबद्दल माहिती दिली. तसेच या राष्ट्रीय परिषदेसाठी पर्यावरण प्रेमी, संशोधक, मार्गदर्शक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभरातून प्राध्यापक व विद्यार्थी या परिषदेसाठी उपस्थित राहून आपले संशोधन निबंध वाचन केले.
समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉ. उत्तम साळवे सर सावरकर महाविद्यालय बीड व डॉ. प्रल्हाद खेतमाळस सर भगवान महाविद्यालय आष्टी उपस्थित होते समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. जवाहरलाल भंडारी सर यांनी सखोल असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सय्यद आय. जी, भूगोल विषयाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. चव्हाण उद्धव, डॉ. एस. एम. शिंदे, डॉ. पी. एस. अनारसे, डॉ . पी. बी. जाधवर यांचे सहकार्य लाभले.
या राष्ट्रीय परिषदेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले व या परिषदेचे सूत्रसंचालन डॉ. अमोल कल्याणकर यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. इन्नूस सय्यद सर यांनी केले.



stay connected