सौ.प्रतिमा अरुण काळे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
निगडी:- शनिवार दिनांक १५/२/२०२५ रोजी पिंपरी चिंचवड माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व आय.आय.बी.करिअर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार सोहळा निमित्त मला सौ.प्रतिमा अरुण काळे,सरस्वती माध्यमिक विद्यालय,आकुर्डी ,पुणे ३५ यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार,२०२५ ज्येष्ठ साहित्यिक ,८९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्रीपाल सबनीस सर,शिक्षण अधिकारी माननीय डॉ.भाऊसाहेब कारेकर सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून प्रशासन अधिकारी श्रीमती संगीता बांगर मॅडम,सहाय्यक आयुक्त माननीय विजयकुमार थोरात सर,प्रसाद गायकवाड सर,नंदकुमार सागर सर,सुबोध गलांडे सर,संभाजी पडवळ सर,हेमंत कुमार अभोणकर सर,बाबाजी शिंदे सर,कृष्णा काळे सर या शुभ प्रसंगी उपस्थित होते.पुरस्कार बाबत प्रतिक्रिया देतांना त्या म्हणाल्या,पुरस्कार म्हणजे कौतुकाची थाप असते,नवीन कार्य करण्याची ऊर्जा असते.सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.


stay connected