महाशिवरात्री निमित्त पिंपळेश्वर देवस्थानच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन.
आ.सुरेश धस यांच्या हस्ते आज रात्री महाभिषेक
आष्टी (प्रतिनिधी) सालाबादप्रमाणे याही वर्षी आष्टी शहरातील पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून.आज मध्यरात्री देवस्थानाच्या वतीने आ.सुरेश धस यांच्या हस्ते महाभिषेक केला जाणार असल्याची माहिती देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
आष्टी तालुक्यासह राज्यातील कानाकोपऱ्यातून महाशिवरात्री निमित्त शहरातील पिंपळेश्वर मंदिरामध्ये महादेवाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची रीघ लागते.महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मध्यरात्री याठिकाणी महादेवाला महाभिषेक घालण्यात येणार असून आ.सुरेश धस यांच्या हस्ते हा महाभिषेक केला जाणार आहे.बुधवारी पहाटे 4 ते 7 यावेळेत सार्वजनिक अभिषेक पार पडल्यानंतर सकाळी 7 वाजल्यापासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.दिवसभर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी उपवासाच्या निमित्ताने महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.शिवाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर यात्रा देखील या दिवशीच भरते.सायंकाळी 7 वाजता महाआरती संपन्न झाल्यानंतर मंदिरावर आकर्षक फटाक्यांची आतषबाजी केली जाणार आहे.गुरुवार दि.27 रोजी दुपारी शहरातून पारंपरिक वाद्यासह पिंपळेश्वर महादेवाच्या प्रतिमेची भव्य शोभा यात्रा संपन्न होणार असून या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
stay connected