रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीचा पोत खालावला : पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे प्रतिपादन

 रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीचा पोत खालावला : पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे प्रतिपादन



--------------------------

राजेंद्र जैन / कडा 

-------------------

शेतीतून अधिकाधिक उत्पादन काढण्यासाठी रासायनिक खताचा भरमसाट वापर केला जात असल्याने जमिनीचा पोत खालावत चालला असून, जमिन नापीक  होऊ लागली आहे. या हायब्रीड बियाण्यांमुळे जमिनीवरच नाही जर मानवाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचे प्रतिपादन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले.


कडा येथील श्री अमोलक जैन शिक्षण संस्थेच्या गांधी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र व भूगोल विभाग आयोजित 'पर्यावरण संरक्षण आणि मानवी कल्याणासाठी शाश्वत कृषी विकास' या विषयावर एक दिवशीय बहुविषयक राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पद्मश्री पोपेरे या बोलत होत्या.



कार्याक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोलक जैन संस्थेचे कार्याध्यक्ष कांतीलाल चानोदिया तर प्रमुख पाहूणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष योगेश भंडारी, डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रोफेसर डाॅ डि एस मुकादम, डाॅ अशोक चव्हाण, उपस्थित होते.



पुढे बोलताना पोपेरे म्हणाल्या की, अधिक उत्पादनासाठी शेतीत हायब्रीड बियाणांचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागल्यामुळे शेतक-यांना प्रत्येक वर्षी नव्याने हे बियाणे विकत घ्यावी लागतात. त्यापेक्षा शेतक-यांनी वर्षानुवर्षे गावरान बियाणांची जपणूक करुन वापरले तर ते शेतीबरोबरच आरोग्यासाठी लाभदायक आहे. स्वानुभव सांगताना त्या म्हणाल्या आपण, स्वत: अनेक अडचणीचा सामना करत गावरान बियाणांची जपणूक करीत सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून बीज बँक तयार केली. त्या बीज बँकमध्ये तृणधान्य बियाणे, फळभाज्या व रानभाज्यांचे बियाणे साठवले असल्याचे पोपेरे यांनी सांगितले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव हेमंत पोखरणा यांनी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. याप्रसंगी संस्थेचे कोषाध्यक्ष डाॅ उमेश गांधी, बाबुलाल भंडारी, संतोष गांधी, प्राचार्य डाॅ हरिदास विधाते,  सोपान निंबोरे, उपप्राचार्य जवाहरलाल भंडारी, चर्चासत्राचे सचिव प्रा पाताळे, प्रा उत्तम साळवे, डाॅ प्रल्हाद खेतमाळस यांच्यास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाॅ अमोल कल्याणकर तर आभार प्रा डाॅ इन्रुस सय्यद यांनी केले.

-------&&--------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.