आज मानवाची जागा यंत्रमानव घेऊ लागलेला आहे - किशोर हंबर्डे

 आज मानवाची जागा यंत्रमानव घेऊ लागलेला आहे - किशोर हंबर्डे                             

आष्टी प्रतिनिधी                                          

 शारीरिक परिश्रम असो की खूप अभ्यास करून यशस्वी व्हायचे असो,त्याला पर्याय नसतो. हे स्पर्धेचे युग आहे इथे पुस्तकाशिवाय पुस्तकाबाहेरचे शिक्षण आवश्यक आहे.आज मानवाची जागा यंत्रमानव घेऊ लागलेला आहे.  आर्टिफिशियलच्या नावाखाली माणसाच्या हातचे काम सुटू लागले आहे.एकीकडे जनसंख्या वाढते आहे आणि दुसरीकडे कमीत कमी मनुष्यबळावर काम करून घेणारी यंत्रमानवाची सरशी झाली आहे.ही  चिंता करण्यासारखी गोष्ट आहे.आणि भविष्यासाठी भयावह सुद्धा.आज विद्यार्थ्यांनी वाचनावर भर दिला पाहिजे.अनेक भाषेमधून ज्ञान संपादन करण्याची विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे.कवी सय्यद अल्लाउद्दीन यांच्या झिंदाबाद... मुर्दाबाद कविता संग्रहातील 25 निवडक कविता प्रा.डॉ.अभय शिंदे यांनी इंग्रजी भाषेत अनुवादित केल्या आहेत,ही महाविद्यालयासाठी अभिमानाची गोष्ट आहे.कवी सय्यद अल्लाउद्दीन यांच्या मराठी कविता महाराष्ट्राला परिचित होत्या,आता त्या इंग्रजी मुळे जगात प्रसिद्धी पावतील,ही गौरवास्पद बाब आहे.असे संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे म्हणाले.आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.अभय शिंदे यांनी कवी सय्यद अल्लाउद्दीन यांच्या कवितांचा इंग्रजी अनुवाद केलेले फेसेस बिहाइंड मास्कस्,आणि इंडियन बुकर प्राईज विनर या दोन पुस्तकांचे संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे यांच्या हस्ते नववर्षारंभी काव्य मैफिलीत प्रकाशन करण्यात आले.प्रास्ताविक प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांनी केले.माननीय शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्राप्त झाल्याबद्दल आणि पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल डॉ.हरीश हातवटे यांचा संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.वेळी काव्य मैफिलीत कवी सय्यद अल्लाउद्दीन,कवी डॉ.हरीश हातवटे,संजय शेळके यांनी बहारदार कविता सादर केल्या.जामखेड येथील प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक कवी प्राचार्य आ.य.पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.पत्रकार उत्तम बोडखे यावेळी उपस्थित होते.सूत्रसंचालन डॉ.अभय शिंदे यांनी केले.डॉ.सखाराम वांढरे यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.