घाटकोपर पोलीस ठाणेच्या विशेष कामगिरीतून गहाळ 300 मोबाईलचे वाटप

 घाटकोपर पोलीस ठाणेच्या विशेष कामगिरीतून गहाळ 300 मोबाईलचे वाटप 



मुंबई,:- महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन आणि नवीन वर्षाचे औचित्य साधून घाटकोपर पोलीस ठाणेच्या हद्दी मध्ये गेल्याकाही वर्षात गहाळ झालेल्या 300 मोबाईल धारकांना तक्रारीनुसार त्यांचे शोध मोहिमेत मिळालेले मोबाईल स्वाधीन करण्याचा कार्यक्रम घाटकोपर पश्चिम एल बी एस रोड, पाटीदार हॉल येथे गुरुवार दिनांक २ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते मोबाईल वितरण करण्यात आले. घाटकोपर पोलीस ठाणे अंतर्गत झालेल्या या मोबाईल शोध मोहीम कारवाईमध्ये परीमंडळ  ७, मुलुंड पोलीस उप आयुक्त विजयकांत सागर, घाटकोपर विभाग सहायक पोलीस आयुक्त शैलेश पासलवार, घाटकोपर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते, पोलीस निरीक्षक (गुन्हे ) श्रीमती दिपाली कुलकर्णी यांच्या मार्गदर्शना खाली मोबाईल चोरी व मोटार वाहन चोरी प्रतिबंधक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग साळुंखे पोह ००२५४/ दिपक भारती, पोह ०६०७३०/निलेश पवार, पोशि ०९१०१२/ अमोल सूर्यवंशी, पोशि ०९१०१४/अजय अहिरे, पोशि १३०७९३/बाळासाहेब गव्हाणे या पथकाने 300 मोबाईल चा शोध लावण्यात विशेष कामगिरी केली आहे. घाटकोपर पोलीस ठाणे नोंद हरवलेल्या मोबाईलचा CEIR या पोर्टलच्या माहितीच्या आधारे, व तांत्रिक कौशल्याचा मानवीय कौशल्य वापर करून माहितीच्या आधारे  निरंतर पाठपुरावा करून या मोबाईलचे वापरकर्ता यांचा शोध घेऊन मुंबई तसेच गुजरात, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार,पश्चिम बंगाल, विविध परराज्यातून एकूण ३०० मोबाईल एकूण किंमत ३७ लाख ७३ हजार रुपयांची मालमत्ता प्राप्त करून तक्रारदार यांना स्वाधीन करण्याचा कार्यक्रम करण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद शेट्टे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.