सुलेमान देवळा येथे धाडसी चोरी
दागिन्यांसह रोख रक्कम असा पाच लाख रुपयांचा ऐवज चोरीला
सुलेमान देवळा ता.२७ ( शेख राजू)- तालुक्यातील सुलेमान देवळा येथील काळे वस्ती येथे गुरुवारी (ता २६) दुपारी २ च्या सुमारास धाडसी चोरी झाली असून दागिने व रोख रक्कम असा ५ लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
सुलेमान देवळा येथील दत्तोबा कारभारी देसाई व त्यांच्या पत्नी हे नेहमी प्रमाणे शेतात काम करण्यासाठी गेले होते. गावापासून दिड किलोमीटर अंतरावर असलेल्या काळे वस्ती येथे रस्त्या लगत घर असल्याने दुपारी २ च्या सुमारास घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी देसाई यांचे घर फोडले.घरातील ४ लाख २९ हजार रुपये किमतीचे साढे पाच तोळे सोने व कांद्याची विक्री पासून मिळालेले ६० हजार रुपयांसह कपडे व इतर साहित्यासह जवळपास ५ लाख रुपयांची चोरी करून चोरांनी पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच आंभोरा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेचे गांभीर्य पाहता श्वान पथक बोलावण्यात आले. रात्री उशिरा आष्टीचे उपविभागीय अधिकारी यांनी भेट दिली. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तावरे करत आहेत.
stay connected