गंगाई- बाबाजी' राज्यस्तरीय आदर्श पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन
-----------------------------------------
आष्टी दि. (प्रतिनिधी) शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, आष्टीचे संस्थापक- अध्यक्ष माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या आई- वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ मागील 20 वर्षापासून येथील भगवान महाविद्यालयामध्ये 'गंगाई- बाबाजी' महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना 'गंगाई -बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने' मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येते. यावर्षी 30 जानेवारी 2025 ते 1 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला 'गंगाई- बाबाजी महोत्सव' मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या महोत्सवामध्ये महाविद्यालयीन वक्तृत्व , काव्यवाचन स्पर्धा व खुल्या लावणीनृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
1 फेब्रुवारी 2025 रोजी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना 'गंगाई -बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने' सन्मानित करण्यात येणार आहे.
यामध्ये 'आदर्श माता- पिता, धार्मिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, साहित्य क्षेत्र, कला क्षेत्र, कृषी क्षेत्र, शिक्षण क्षेत्र (प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन), क्रीडा क्षेत्र, पत्रकारिता, आदर्श ग्रामविकास अधिकारी, आदर्श तलाठी व आदर्श सरपंच या
क्षेत्रांचा समावेश आहे. या क्षेत्रापैकी कोणत्याही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य असणाऱ्या मान्यवरांनी सोमवार दिनांक 20 जानेवारी 2025 पर्यंत आपले प्रस्ताव भगवान महाविद्यालय, आष्टी येथे सादर करावेत, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी आपण डाॅ.दत्तात्रय वाघ (प्राचार्य-9423716852), डॉ. ज्ञानदेव वैद्य (उपप्राचार्य-9423716859) व डॉ. आप्पासाहेब टाळके (उपप्राचार्य-9421443590) व डॉ.आबासाहेब पोकळे (9763434546)यांच्याशी संपर्क साधावा असे महाविद्यालयाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.
stay connected