आष्टीच्या सिनेलेखक संजय नवगिरे चा वर्षात चौथ्यांदा श्रीगणेशा
आष्टी तालुक्यातील कडा कारखाना येथील सिनेलेखक संजय नवगिरे याचा सिनेसृष्टीत जोरदार प्रवास चालू असताना एकाच वर्षात सलग चौथा चित्रपट श्रीगणेशा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
रेडू, टकाटक, फ्री हिट दणका, ढीषक्यांव , अल्याड पल्याड , पाणीपुरी या आणि अशा इतर काही सुपरहिट चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या लेखणीचा मराठवाडी ठसा सिनेसृष्टीत उमटविणाऱ्या संजय नवगिरे चा श्रीगणेशा नावाचा चित्रपट 20 डिसेंबर पासून चित्रपट गृहात झळकला आहे.
शशांक शेंडे , प्रथमेश परब , संजय नार्वेकर , मेघा शिंदे अशी तगडी स्टार कास्ट असलेल्या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी केलं असून संजय भोसले यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
संजय नवगिरे आष्टी तालुक्यातील कडा सहकारी साखर कारखाना जळगाव येथील रहिवाशी असून जळगावच्या जयभवानी विद्यालय येथे शालेय शिक्षण पूर्ण करून आष्टीच्या कला वाणिज्य ( हंबर्डे ) महाविद्यालयात त्याचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालंय. यंदाच्या वर्षात अल्याड पल्याड, आम्ही जरांगे , पाणीपुरी या बहुचर्चित चित्रपटाच्या लेखनातून हॅटट्रिक करून चालू वर्षाला निरोप देताना श्रीगणेशा हा त्याने पटकथा आणि संवाद लेखन केलेला चित्रपट प्रदर्शित होतो आहे . चित्रपटाच्या ट्रेलरला मध्यमावरचा जोरदार प्रतिसाद पाहता हा चित्रपट या वर्षातील शेवटच्या बॉल वरचा सुपरशॉट आणि येणाऱ्या काळाची नांदी ठरावी ही अपेक्षा !!!
stay connected