जनतेच्या सुखादुखात सक्रिय असलेल्या सुरेश धसांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या- संदिप खाकाळ याचे मतदारांना आवाहन
कडा- राजकारण करताना कधीच भेदभाव न करता किवा जातापातीचा न पाहता माणुसकी हीच जात लक्षात घेऊन जनतेच्या सुखादुखात रात्री अपरात्री सहभागी असलेल्या सुरेश धस यांना कमळ चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन संदिप खाकाळ यानी मतदारांना केले आहे.
२३१ आष्टी विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप,रिपाई,व मित्रपक्षाचे कमळ चिन्हावर निवडणूक लढवत असलेले उमेदवार सुरेश धस यांना मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर पांठिबा मिळत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण करताना सुरेश धस यांनी सर्व सामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्याचे काम केले.त्याच बरोबर कोणाच्या कुटुंबातील रूग्ण असो त्याला मदत करणे,गावच्या सर्वागीण विकाससाठी शासन दरबारी भांडून विकास निधी आणणे,कार्यकर्त्यांना आधार देऊन त्यांना बळ देण्याचे काम केले.एवढेच नव्हे नवतरूण देखील मोठ्या प्रमाणावर धसांच्या सोबत आहेत.उद्याच्या निवडणुकीत सर्वानी कसलाही विचार न करता सुरेश धस यांना मोठ्या प्रमाणावर मताधिक्य देऊन निवडून द्यायचे आहे.यासाठी विशेष करून तरूणांनी मोठ्या जोमाने कामाला लागावे आणि आण्णाला निवडून आणण्यासाठी जिवाचे रान करावे असे आवाहन संदिप खाकाळ यांनी केले आहे.
stay connected